Viral video: नणंद-भावजयीचं नातं म्हटलं तर प्रेमाचं, पण म्हटलं तर वादाचंही असतं. लग्न करून घरात आलेल्या मुलीला नवरा, सासू-सासरे यांच्याबरोबरच दीर व नणंदांनाही आपलंसं करून घ्यावं लागतं; मात्र त्या घरावर हक्क सांगणारी नणंद काही वेळा भांडणाचं कारण ठरते. असे म्हटले जाते की, दहा पुरुष एकत्र राहू शकतात. मात्र दोन महिला एकत्र राहू शकत नाहीत, अगदी त्या सख्ख्या बहिणी असल्या तरी. मात्र सध्या समोर आलेला नणंद-भावजयचा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल नात असं असावं.सोशल मीडियावर रोज वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. यामध्ये दिर-वहीनी, नणंद-भावजय आदींचे डान्स व्हिडिओ लगेच प्रसिद्ध होतात. लोकांचीही अशाप्रकारच्या व्हिडिओजना विशेष पसंती मिळते. सध्या एका नणंदेचा आणि वहिनीचा डान्स व्हायरल होतोय. इतकं काय भन्नाट आहे या डान्समध्ये जाणून घेऊ…

लग्नानंतर मुलीचं आयुष्य खूप बदलतं. नवं घर, नवी नाती सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागते. घरात नणंद असेल, तर वाद होण्याची शक्यता जास्त असते. कारण ती त्या घरात लहानाची मोठी झालेली असते. असं असलं तरी नणंद व भावजयीचं नातं बहिणींसारखं असतं. काही वेळा तर बहिणींपेक्षाही जास्त चांगलं नातं नणंद-भावजयींचं असतं. अशाच नणंद आणि वहिनीनी लग्नामध्ये भन्नाट डान्स केला आहे. आतापर्यंत तुम्ही लग्नातले नवरा-नवरीचे अनेक डान्स पाहिले असतील पण नणंद-वहिनींच्या जोडीच्या डान्सची सध्या एकच चर्चा सुरु आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, दोघीही इतक्या मनसोक्त नाचल्या आहेत की सर्वच पाहत राहिले आहेत. हळदीला दोघींनीही पिवळ्या रंगाच्या साड्या नेसून भन्नाट ठुमके मारले आहेत. दोघीही बेभान होऊन नाचत आहेत. लग्न म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक खास, महत्त्वाचा असा क्षण असतो आणि हा क्षण फक्त नवरा-नवरीच नव्हे तर सर्वांच्या कायम लक्षात राहावा यासाठी प्रयत्न केले जातात. व्हिडीओ पाहून तुम्हीच सांगा कोण ठरलं सरस..

पाहा व्हिडीओ

View this post on Instagram

A post shared by Ketaki Agre (@ketaki12131)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर praju2127’s या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला लाखोंमध्ये व्ह्यूज मिळाले आहेत. तर नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय, “नंणद असावी तर अशी हौशी” तर आणखी एकानं प्रतिक्रिया दिली आहे की, “मैत्रीणीच वाटत आहेत.”