करोनामुळे अवघ्या जगाला चिंतेने ग्रासले आहे. करोनाचे रुग्ण वाढत असताना दुसरीकडे अफवांनी लोकांच्या मनात भीती पसरवली आहे. अशा अफवा पसरणाऱ्यां विरोधात महाराष्ट्र सरकारने कडक भूमिका घेतलेली असताना एकाला टिक टॉक व्हिडीओ करण अंगलट आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मालेगावर येथे राहणाऱ्या एका ४० वर्षीय व्यक्तीने टिक-टॉकवर करोना व्हायरसशी संबंधीत आक्षेपार्ह व्हिडीओ शेअर केला होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच पोलिसांनी त्या व्यक्तीला अटक केली आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार या व्यक्तीवर कलम १५३ आणि कलम १८८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती नोटांनी तोंड आणि नाक पुसताना दिसत आहे. तसेच तो करोनासारख्या आजारावर कोणतेही उपचार नाहीत असे बोलताना दिसत आहे.

‘या व्यक्तीने व्हिडीओमध्ये नाक आणि तोंड पुसण्यासाठी पैशांचा वापर केला आहे. तसेच त्याने धार्मिक भावना दुखावल्या आहेत’ असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने म्हटले आहे. सायबर गुन्हे शाखा पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी व्हिडीओ कुठून शेअर झाला हे शोधून काढले. गुरुवारी त्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. आरोपीला शुक्रवारी मालेगाव सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nashik rural police act against man wiping nose mouth with currency notes avb
First published on: 03-04-2020 at 18:40 IST