Elephant Video Viral: आई आणि तिच्या मुलांचे प्रेम जगातील सर्वात निर्मळ नातं मानलं जातं. मग ती आई एखादी व्यक्ती असो किंवा एखादा प्राणी. सोशल मीडियावर याप्रकारचे व्हिडीओ सतत व्हायरल होत असतात. नुकताच एका जंगलातील काही हत्तींचा व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये एका हत्तीचे लहान पिल्लू त्याच्या आईला शोधताना दिसत आहे. या व्हायरल व्हिडीओला युजर्स मोठ्या प्रमाणात पसंती देताना दिसत आहेत.

हा व्हायरल व्हिडीओ केनियाच्या अंबोसेली नॅशनल पार्कमधील असून या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, हत्तीचे लहान पिल्लू गवताळ प्रदेशातून एकटेच पळत पळत आईला शोधत हत्तीच्या कळपात येते. त्यावेळी ते इतर हत्तींकडे पाहते, पण त्याला त्याची आई कुठेच दिसत नाही. शेवटी काही अंतरावर नदीच्या काठी त्याला त्याची आई दिसते आणि ते आईजवळ पळत जाते. आईला पाहून ते पिल्लू आपल्या सोंडेने तिला कुरवाळते. आई आणि तिच्या बाळाचे हे प्रेम पाहून युजर्सही भावूक झाले आहेत.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @sightingsbyphil या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला आत्तापर्यंत पाच लाखांहून अधिक व्ह्यूज, तर ४६ हजारांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये “मी हा हजार वेळा पाहिला आहे आणि मी अजूनही हसत आहे! तुम्ही ही छोटी क्यूटी किती वेळा पाहिली?” असं लिहिण्यात आलं आहे.

हेही वाचा: ७३व्या वाढदिवशी पत्नीला दिलं ‘हे’ जबरदस्त सरप्राईज; VIDEO पाहून युजर्सही म्हणाले… “हे दोघं किती रोमाँटिक आणि आम्ही अजूनही एकटे…”


पाहा व्हिडीओ:

या व्हिडीओवर अनेक युजर्सही कौतुक करताना दिसत आहेत. ज्यात एकाने लिहिलंय की, “क्यूटनेस ओव्हरलोड!”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “तो त्याच्या आईला शोधण्यासाठी किती वेगाने धावतोय”, तर तिसऱ्या व्यक्तीने लिहिलंय की, “खूप सुंदर बाळ, देवाचे आभार त्याला त्याची आई पटकन सापडली.”

दरम्यान, नुकत्याच काही दिवसांपूर्वी हत्तीचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये रूपा नावाची मादी माहुताला चक्क हापशी हापसून पाणी पाजत होती. गडचिरोली जिल्ह्यातील कमलापूर येथे असलेले राज्यातील एकमेव हत्ती कॅम्प कायम चर्चेत असते. यावेळी रूपा हत्तीने माहुताबद्दल दाखवलेल्या प्रेमाची चर्चा रंगली होती.