Navneet Rana Dance Video: कधी हातात बॅट घेऊन मैदान गाजवत, कधी ढोलाच्या तालावर थिरकत, तर कधी ट्रॅक्टर आणि नांगर हातात घेऊन शेतात उतरणाऱ्या अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा पुन्हा एकदा चर्चेत आहेत. मात्र, यावेळी कारण आहे त्यांच्या हटके अंदाजातील डान्सचा व्हिडीओ, जो सध्या सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घालत आहे. ‘किसी के हाथ ना आएगी ये लड़की’ या श्रीदेवीच्या आयकॉनिक गाण्यावर त्यांनी केलेला डान्स पाहून अनेक जण थक्क झाले आहेत.

सध्या सोशल मीडियावर नवनीत राणांचा एक खास डान्स व्हिडीओ प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये त्या पिंक पंजाबी सूट परिधान करून, हातात पांढरी छत्री घेतलेल्या दिसत आहेत आणि श्रीदेवीच्या ‘चालबाज’ (१९८९) चित्रपटातील “किसी के हाथ ना आएगी ये लड़की…” या सुपरहिट गाण्यावर थिरकताना पाहायला मिळतात. विशेष म्हणजे, त्यांनी या गाण्यातील मूव्हज आणि एक्स्प्रेशन्स अगदी श्रीदेवीसारखे हुबेहूब रिक्रिएट करण्याचा प्रयत्न केला आहे.

या व्हिडीओला लाखो व्ह्युज मिळाले असून, सोशल मीडियावर काही जण त्यांचं कौतुक करत आहेत तर काही जणांनी ट्रोलही केलं आहे. तरीही नवनीत राणांचा हा झळाळता अंदाज प्रेक्षकांच्या लक्षात राहिलाच आहे. हा व्हिडीओ नेमका कधी आणि कुठे शूट करण्यात आला याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध नाही, मात्र सूत्रांच्या माहितीनुसार तो परदेशात शूट करण्यात आला आहे.

कोण आहेत नवनीत राणा?

नवनीत कौर राणा या माजी अभिनेत्री असून त्यांनी २०१९ मध्ये अमरावतीतून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक जिंकून लोकसभेत प्रवेश केला होता. २०२४ मध्ये त्यांनी भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवली, मात्र काँग्रेसच्या बलवंत वानखेडे यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. अभिनय कारकिर्दीत त्यांनी तेलुगू, कन्नड, मल्याळम, पंजाबी व हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

२०११ मध्ये त्यांनी विवाहानंतर चित्रपटसृष्टीचा निरोप घेतला आणि समाजकार्यासाठी सक्रिय झाल्या. त्यांचे पती रवि राणा हे देखील राजकीय नेते असून त्यांनी “युवा स्वाभिमान पार्टी”ची स्थापना केली आहे. विशेष म्हणजे, नवनीत आणि रवि राणा यांनी ३,१६२ जोडप्यांच्या सामूहिक विवाह समारंभात लग्न केले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

येथे पाहा व्हिडीओ

आता चर्चेत श्रीदेवी स्टाईलमुळे!

राजकारणात आक्रमक आणि आघाडीवर असलेल्या नवनीत राणा यांचा हा फिल्मी अंदाज अनेकांना थक्क करतोय. “श्रीदेवी रिटर्न्स?” असा प्रश्न अनेकांनी सोशल मीडियावर विचारला आहे. डान्स, राजकारण आणि चर्चेचा केंद्रबिंदू नवनीत राणा यांचा हा व्हिडीओ पाहिलात का?