Navratri 2025: शारदीय नवरात्रीला २२ सप्टेंबरपासून सुरूवात झाली आहे. देशभरात प्रत्येक जण हा उत्सव वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करताना दिसतात. अशात तुम्ही जास्तीत जास्त काय विचार कराल, की मी यावर्षी कोणतं वेगळं आउटफिट ट्राय करू किंवा कुठे नवीन ठिकाणी गरबा खेळायला जाऊ वगैरे वगैरे… पण हा व्हायरल व्हिडीओ जर तुम्ही पाहिलात, तर तुम्ही म्हणाल अरे हे कसं सुचलं… आपण माणसं सर्व सम अगदी उत्साहाने साजरे करतो. मग प्राण्यांनी का नाही? नेमकं हेच घडलंय… एका ठिकाणी चक्क पाळीव कुत्र्‍यांना त्यांच्या मालकांनी गरब्याच्या पारंपरिक वेशात मैदानात उतरवलं होतं.

ही Pawratri आहे…

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्हाला पारंपरिक गरबा पोशाखात सजलेला शिह त्झू जातीचा पाळीव कुत्रा अगदी आनंदाने नवरात्रोत्सवात सामील होताना दिसेल. पुलकित अग्रवाल याने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडीओमध्येपाळीव प्राणी गरब्याच्या पोशाखात असलेल्या इतर कुत्र्‍यांसह वावरताना दिसत आहे.

या व्हिडीओमध्ये मुख्य आकर्षण म्हणजे हे लहान पाळीव प्राणी त्यांच्या मालकांसोबत गरब्याचा आनंद घेत आहेत. काही जण या कुत्र्‍यांना मिठीत घेऊन खेळताना दिसत आहेत. या पोस्टला त्यांनी कॅप्शन दिलं आहे की, ही pawratri आहे आणि इंटरनेट यासाठी पुरेसे नाही.

या व्हिडीओनंतर नेटकऱ्यांनी यावर भरपूर आश्चर्यकारक आणि आनंदी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने म्हटले की, मला कुत्र्यांची भीती वाटते, पण नवरात्रीच्या पोशाखातील हे कुचु पुचु मला खूप आवडलेत. दुसऱ्या एकाने लिहिले की, कुत्ते की भी फिलिंग होती है. तर आणखी एका युजरने लिहिले की, हा चांगला उपक्रम आहे, पण सर्वात दु:खद भाग म्हणजे व्हिडीओमध्ये एकही भारतीय कुत्रा नाही. तेदेखील घर, प्रेम आणि काळजी घेण्यास पात्र आहेत. त्यांनाही कृपया दत्तक घ्या, खरेदी करू नका.

भक्तीच्या पलिकडे जात हा एकत्र येण्याचा, आनंदाचा आणि सर्जनशीलतेचा काळ आहे आणि हा व्हायरल झालेला Pawratri क्षण पाळीव प्राणीदेखील या उत्सवाचा भाग कसे बनत आहेत हे सुंदरपणे टिपतो.