Woman Undergarments Robbery : गुजरातच्या अहमदाबादमधून एक आगळीवेगळी घटना समोर आली आहे. मागील काही महिन्यांपासून एक ३० वर्षीय महिला खूप टेंशनमध्ये होती. कारण तिचे अंडरगारमेंट्स चोरीला जात होते. मागील आठ महिन्यांपासून अंडरगारमेंट्स चोरी करणाऱ्या चोरट्याला पकडण्यासाठी या महिलेनं मोठी शक्कल लढवली. त्यानंतर तिला या चोरट्याबाबत माहित झालं आणि हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही महिला अहमदाबादच्या धंधुका तहसीलच्या पक्षम गावातील रहीवासी आहे. कपडे धुतल्यानंतर ते सुखवण्यासाठी दोरीवर ठेवायची. मात्र, तिचे अंडरगारमेंट्स कुणीतरी चोरी करायचा. त्यानंतर चोरट्याला पकडण्यासाठी या महिलेनं एक कॅमेरा लावला. जेव्हा चोरटा पु्न्हा चोरी करायला आला, त्यावेळी तो महिलेनं लावलेल्या कॅमेरात कैद झाला. महिलेनं कॅमेरा चेक केल्यानंतर तिला धक्काच बसला.

नक्की वाचा – नद्या कशाप्रकारे तयार होतात? जंगल सफारी करताना वन अधिकाऱ्याला मिळालं उत्तर, निसर्गाचा सुंदर Video केला शेअर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चोरट्याला पकडल्यानंतर उडाली खळबळ

कॅमेरातील फुटेज तपासल्यानंतर महिलेला चोरटा शेजारी राहत असल्याचं कळलं. त्यानंतर पुढच्या दिवशी त्या महिलेनं चोरट्यावर नजर ठेवली. त्यानंतर त्या चोरट्याला अंडरगारमेंट्स चोरताना महिलेनं पाहिलं. तिने त्या चोरट्याचा पाठलाग केला आणि चोरलेल्या अंडरगारमेंट्सचा शोध लावला. चोरट्याने महिलेसोबत छेडछाड केली आणि तिला मारहाणही केली. त्यानंतर महिलेने आरडाओरडा सुरु केला. महिलेचा आवाज ऐकताच तिच्या कुटुंबातील माणसं लाठ्याकाठ्या घेऊन घटनास्थळी पोहोचले. चोरट्याच्या नातेवाईकांनीही महिलेच्या कुटुंबियांसोबत हाणामारी केली. त्यानंतर धंधुका पोलिसांनी जवळपास २० जणांना अटक केली, अशी माहिती समोर आली आहे.