मोबाईलने आपल्या समस्या जितक्या सोप्या केल्या आहेत, तितक्याच समस्यांनाही जन्म दिला आहे. आजकाल लोक जेवायला विसरतात; पण घराबाहेर पडताना सोबत मोबाईल घ्यायला विसरत नाहीत. काही महाभाग तर टॉयलेटमध्ये वेळ जात नाही म्हणून मोबाईल घेऊन जातात. हल्ली लहान असो वा वृद्ध प्रत्येकाकडे स्वत:चा मोबाईल आहे. पण, या मोबाईलमुळे लोक इतके वेडे झालेत की, त्यांना झोपेतही मोबाईल आठवतो. अनेकदा त्यामुळे अपघाताच्या घटनाही घडताना दिसतात. सध्या सोशल मीडियावर अशाच एका अपघाताचा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे; जो पाहून तुमच्या अंगावर काटा येईल. त्यात मोबाईलमध्ये गुंग झालेल्या तरुणाच्या जीवाला धोका निर्माण झाल्याचे दिसेल.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुण एका टेबलासमोरील खुर्चीत बसला आहे. यावेळी त्याच्या एका हातात मोबाईल आणि दुसऱ्या हातात गरम पाण्याची किटली आहे. यावेळी तो मोबाईलमध्ये इतका गुंग होता की, तो हातातील गरम पाण्याची किटली कुठे ठेवत होता हेच त्याने पाहिले नाही. त्याला ही किटली टेबलावर ठेवायची होती; मात्र त्याचे सर्व लक्ष मोबाईलवर असल्याने त्याने किटली नीट टेबलावर ठेवली गेली नाही. त्यामुळे किटलीतील सर्व गरम पाणी मोबाईलसह त्याच्या अंगावर पडले.

उकळते पाणी अंगावर सांडल्याने तो तरुण तडफडत जागेवरून उठला. यावेळी काय करावे हेच त्याला सुचत नव्हते. या सर्व गडबडीत त्याचा मोबाईलही हातातून निसटून जमिनीवर पडला. तो तरुण त्या ठिकाणाहून जोरजोरात किंचाळत उठला. व्हिडीओमध्ये तुम्ही त्या व्यक्तीच्या अंगावर उकळते पाणी पडल्याने त्याची काय अवस्था झालीय ते पाहू शकता. त्याने मोबाईलकडे लक्ष दिले नसते, तर कदाचित हा अपघात टळला असता. मात्र, तो आपला मोबाईल वापरण्यात पूर्णपणे मग्न राहिल्याने त्याने किटली नीट ठेवली आहे की नाही याकडेही लक्ष दिले नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पण, मोबाईलमुळे अपघात झाल्याची ही काही पहिली घटना नाही. यापूर्वीही अनेकदा मोबाईलमुळे जीव धोक्यात आल्याचे व्हिडीओ समोर आले होते. पण, तरीही लोक बेफिकीर वागणे सोडत नाहीत.