Housequeen Marathi Video: लोकसत्ताच्या इन्फ्लुएन्सरच्या जगात या सीरीजमध्ये गप्पा मारताना हाऊसक्वीन (Housequeen) धनश्री पवार हिने आपल्या आयुष्यातील अत्यंत धक्कादायक घटनेविषयी खुलासा केला आहे. धनश्री पवार ही मागील सहा वर्षांपासून युट्युबवर हाऊसक्वीन या नावाने व्हिडीओ अपलोड करते. २ लाखाहून अधिक सबस्क्राइबर्सचा टप्पा गाठलेल्या धनश्रीने लाइफस्टाइल, मेकअप, फॅशन, कुकिंग आणि बरंच काही अशा विविध विषयांचे व्हिडीओ बनवले आहेत. या प्रवासात धनश्रीने लाखो लोकांना जोडली असली तरी आपल्या स्वतःच्या पोटच्या बाळाची झालेली ताटातूट तिच्या वाट्याला सर्वात मोठं दुःख बनून आली होती. या प्रसंगाविषयी तिने इन्फ्लुएन्सरच्या जगात या सिरीजमध्ये बोलताना उलगडा केला आहे.

दुसऱ्या प्रेग्नन्सी दरम्यान सासूबाईंचे निधन, कोलमडलेला बँक बॅलन्स, प्रवास, नवऱ्याची प्रकृती हे सगळं घडत असताना धनश्रीची डिलिव्हरी झाली होती. गुटगुटीत असूनही तिचे बाळ जन्मापासून एकदाही रडले नव्हते. नऊ दिवसांनी या बाळाने जीव सोडला पण त्या जन्माच्या दिवसापासून ते मृत्यूपर्यंत नऊ दिवसांच्या कालावधीत तिची काय अवस्था झाली होती हे ऐकून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल. हा सगळा प्रसंग पुन्हा आठवताना डोळ्यातून एकही अश्रू न ढाळण्याचे बळ तिला एका सबस्क्राइबरच्या कमेंटने दिले होते याविषयीही तिने शेअर केलेला अनुभव या व्हिडिओमध्ये पाहा.

Video: ९ दिवसांचं बाळ गमावलं आणि..

हे ही वाचा<< २०२३ मध्ये शून्य सबस्क्राइबर्स पासून युट्युब चॅनेल हिट कसं करावं? Housequeen ने सांगितलं गुपित

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आजपर्यंत आपण लोकसत्ता ऑनलाईनच्या ‘इन्फ्लुएन्सरच्या जगात’ या सीरीजला प्रचंड प्रेम दिले आहे, हेच पुढेही कायम असू द्या. भविष्यात तुम्हाला कोणत्या इन्फ्लुएन्सर्सच्या आयुष्याविषयी, प्रवासाविषयी जाणून घ्यायला आवडेल हे सुद्धा कमेंट करून नक्की कळवा.