केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी चेक प्रजासत्ताकमधील प्राग येथे स्कोडाच्या हायड्रोजन बसची चाचणी घेतली. तसेच त्यांनी प्राग येथे २७ व्या जागतिक रोड काँग्रेसमध्ये रस्ते सुरक्षा या विषयावरील मंत्रीस्तरीय सत्रात भाग घेतला. यावेळी त्यांनी हायड्रोजन बसचा आढावा घेतला आणि स्कोडा अधिकाऱ्यांशीही या तंत्रज्ञानाबाबत चर्चा केली, अशी माहिती नितीन गडकरी यांच्या कार्यालयाने X वर फोटो शेअर करुन दिली.

अलीकडेच गडकरी म्हणाले होते की, भारतातील एकूण वायू प्रदूषणात वाहतूक क्षेत्राचा वाटा ४० टक्के आहे. ही समस्या कमी करण्यासाठी हरित इंधन पर्याय विकसित करण्याचा सातत्याने प्रयत्न केलाय. पर्यायी हरित इंधन विकसित करण्यावर गेल्या काही वर्षांपासून गडकरी भर देत आहेत.

(हे ही वाचा : रील बनवण्याच्या नादात गमावला जीव; भरधाव रेल्वेने दिली धडक, हृदय पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल )

ग्रीन मोबिलिटीच्या दिशेने भारत एक महत्त्वाचं पाऊल टाकत आहे. हायड्रोजन बस चालवण्यासाठी फ्यूल सेल हायड्रोजन आणि वायूचा वापर करून वीजनिर्मिती केली जाते आणि या वाहनांमधून केवळ पाणी बाहेर पडतं. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की, हायड्रोजन बेस्ड वाहनं ही पर्यावरणास सर्वात अनुकूल अशी वाहनं आहेत. हायड्रोजन हे ऊर्जेच्या आवश्यकतेमधील हे अधिक कार्यक्षम पसंती म्हणून उदयाला येऊ शकते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काही तासांपूर्वी शेअर केल्यापासून या पोस्टला असंख्य लाइक्स मिळत आहेत. अनेकांनी ट्विटच्या कमेंट सेक्शनमध्ये जाऊन त्यांचे विचारही मांडले आहेत. एका युजर्सने, येत्या काही वर्षांत सर्व सरकारी बसेस हायड्रोजनवर चालवण्याची विनंती केली, तर दुसर्‍याने हायड्रोजन कारच्या मोठ्या प्रमाणावर उत्पादनाबद्दल चौकशी केली.