Nitin Gadkari Earnings: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आपल्या ओघवत्या वक्तृत्व शैलीमुळे अगदी सामान्य माणसांमध्येही प्रसिद्ध आहेत. त्यांचे किस्से ऐकण्यासाठी अनेकजण उत्सुक असतात आणि गडकरीही कधीच या मंडळींना नाराज करत नाही. काही दिवसांपूर्वी नितीन गडकरी हे इंडियन एक्सप्रेस आयोजित कार्यक्रमात बोलत होते ज्यावेळी सुद्धा त्यांनी आपल्या वजन कमी करण्याच्या प्रवासापासून ते आवडत्या पदार्थांपर्यंत बऱ्याच गोष्टींवर भाष्य केले. गडकरींनी या कार्यक्रमात स्वतःच्या युट्युब चॅनेलचा सुद्धा खास उल्लेख केला. तुम्हाला माहित नसेल तर गडकरी यांच्या खाजगी युट्युब चॅनेलला तब्बल ४ लाख ६१ हजार सबस्क्राइबर्स आहेत. इतकंच नव्हे तर युट्युबवरील व्हिडीओच्या माध्यमातून गडकरींची महिन्याला उत्तम कमाई सुद्धा होते.

अनेक कार्य्रक्रमांध्ये त्यांची गाजलेली भाषणे व चर्चा सत्र त्यांच्या युट्युबवर पाहायला मिळतात. अनेक चाहते हे व्हिडीओ अगदी आवडीने बघतात, गडकरी सांगतात की माझा हा मंत्र आहे की जे कमवाल ते इमानदारीने कमवा, शॉर्ट कटने नाही कारण पैसे हे जीवनाचं साधन आहे ध्येय नाही. याच मंत्रानुसार नितीन गडकरी हे महिन्याला युट्युबकडून जवळपास ३ लाखाच्या आसपास कमाई करतात.

हे ही वाचा<< नितीन गडकरी यांनी श्वसनाचा त्रास व कफ दूर करण्यासाठी फॉलो केले ‘हे’ ७ व्यायाम; ५६ किलो वजनही घटवलं

नितीन गडकरींची युट्युब कमाई ऐकून जितका तुम्हाला धक्का बसला असेल तितकाच अभिमान तुम्हाला ते आपले पैसे कुठे खर्च करतात हे वाचून वाटेल.ते म्हणतात की, ‘दुनिया ने हमको दिया क्या, दुनिया ने हमसे लिया क्या?’ हे गाणं माझं आवडतं आहे आणि मी त्याचे पालन करतो. गडकरी सांगतात की मी एक नियम बनवला आहे की आपल्या मिळकतीचा एक भाग आपण गरजूंसाठी काढून ठेवायचा, हाच नियम मी माझ्या कुटुंबाला सुद्धा फॉलो करायला सांगतो. मला एवढंच वाटतं की प्रत्येकाने चांगलं राहायला हवं व चांगलं काम करायला हवं.

हे ही वाचा<< नितीन गडकरी यांनी ताज हॉटेलमध्ये शेफला पगार विचारला; म्हणतात, “रोज संध्याकाळी ७ नंतर मी..”

दरम्यान, याच कार्यक्रमात गडकरी यांनी आणखी एक इंटरेस्टिंग किस्सा सांगितला. ते म्हणतात, “मी एकदा जहाजावर होतो तेव्हा माझ्यासोबत अनेक मोठे उद्योगपती होते. सकाळी नाष्टा झाल्यावर मी त्यांना मी झोपायला जातो असे सांगितले तेव्हा ते म्हणाले की तुम्ही आजचे वर्तमानपत्र वाचले नाहीत का, काहीतरी मोठं घडलं होतं..तेव्हा त्यांना मी सांगितलं की मला चिंता करायला आवडत नाही म्हणून ना मी पेपर वाचतो ना मी टीव्ही बघतो. “