उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांच्या शपथविधीपूर्वी पुन्हा एकदा गरीबांच्या हातगाड्यांवर बुलडोझर फिरले आहेत. एका आजोबांची हातगाडीचा पार चुरा करण्यात आला. हे आजोबा वारंवार रडत विनवण्या करत होते. हात देखील जोडले, पण अधिकाऱ्यांना काही पाझर फुटला नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांच्या शपथविधीपूर्वी पुन्हा एकदा गरीबांच्या हातगाड्यांवर बुलडोझर फिरले आहेत. राज्यात अनेक ठिकाणी बेकायदेशीरपणे भूखंडावर कब्जा करणाऱ्यांची मालमत्ता बुलडोझरने जमीनदोस्त करण्यात आली आहे. पण याच दरम्यान नोएडामधील अधिकाऱ्यांनी तर कहरच केला. एका गरीब आजोबांनी रस्त्याच्या कडेला उसाच्या रसाची गाडी लावली होती. अधिकाऱ्यांनी या आजोबांच्या उसाच्या रसाची गाडी खिळखिळी करून टाकली. त्यांच्या गाडीवर तोडफोड करण्यात आली. आजोबांनी त्यांच्यापुढे आपले थकलेले हात जोडले, त्यांच्या गाडीवरील नुकसानासाठी रडत राहिले, पण नोएडा प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना आजोबांचे अश्रू पाहून पाझर फुटला नाही. आता या घटनेचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : ‘शांतपणे उभा होता ना कुत्रा, उगाच लाथ मारायला निघाला, अन् स्वतःच धापकन पडला’

ही घटना नोएडातील सेक्टर ४२ मधील आहे. इथे रस्त्याच्या कडेला सतीश गुर्जर नावाचे आजोबा मशिनमधून उसाचा रस काढून त्याची विक्री करत होते. त्यावरच ते आपल्या दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था करत होते. बुलडोझरसह अतिक्रमण काढण्यासाठी आलेल्या नोएडा प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची नजर आजोबांच्या उसाच्या रसाच्या गाडीवर पडली. मग काय, त्यांनी जेसीबीने ज्यूस मशीन उचलण्यास सुरुवात केली. रस्त्याच्या कडेला मशीन लावणार नाही असं हे आजोबा वारंवार घसा फोडत सांगत होते. इतकंच काय तर आजोबांनी अधिकाऱ्यांसमोर आपले थकलेले हात जोडून ओक्साबोक्शी रडू लागले. पण अधिकारी कुठे थांबणार होते? त्यांनी मशीन उचलण्याचे आदेश दिले. बुलडोझरमधून मशिन उचलून डंपरमध्ये जोरजोरात आपटून उलटवली.

आणखी वाचा : जमिनीपासून कित्येक फूट उंचीवर स्कायडायव्हर्सचा अफलातून डान्स, VIRAL VIDEO पाहाच

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : रिकाम्या विमानात एअर होस्टेसचा ‘बलम पिचकारी’ गाण्यावर धांसू डान्स, VIRAL VIDEO एकदा पाहाच

या घटनेचा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. समाजवादी पक्षानेही या घटनेचा व्हिडीओ शेअर करत योगी सरकारवर निशाणा साधला आहे. सपाच्या ट्विटर हँडलवर लिहिले आहे की, “नोएडामध्ये उसाचा रस विकून आपलं पोट भरणाऱ्यावर बुलडोझर चालवून भाजप सरकारच्या सरदारांनी संपूर्ण कुटुंबाला रस्त्यावर आणलंय. मला माहित नाही की सरकारला काय धोका असेल? भाजप पुन्हा एकदा सत्तेत येताच गरिबांना उद्ध्वस्त करत आहे.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Noida sugarcane juice seller machine damage by bulldozer viral video prp
First published on: 24-03-2022 at 13:49 IST