scorecardresearch

डोळ्यावर पट्टी बांधून व्यक्तीने बनवले नूडल्स; Video पाहून नेटीझन्स झाले थक्क

रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्याने डोळ्यावर पट्टी बांधून नूडल्स बनवल्याचा व्हिडीओ चांगलाचं व्हायरल होत आहे.

Noodles made by blindfolded person
व्हायरल व्हिडीओ (फोटो:@nagpur_buzz / Instagram)

सोशल मीडियावर असे व्हिडीओ असतात जे आपल्याला आश्चर्यचकित करतात किंवा ज्याला पाहिल्यानंतर आपला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्याने डोळ्यावर पट्टी बांधून नूडल्स बनवल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ही व्यक्ती मध्य प्रदेशातील इंदूरची रहिवासी आहे.

व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ नागपूर बझ नावाच्या इंस्टाग्राम पेजने पोस्ट केला आहे. या छोट्या व्हिडीओमध्ये, स्वत:ला इंदोरी जॅक स्पॅरो (जॅक स्पॅरो हे जॉनी डेप अभिनीत पायरेट्स ऑफ द कॅरिबियन चित्रपटातील प्रसिद्ध पात्र) म्हणवून घेणारा रस्त्यावरचा विक्रेता चाउमीन डोळ्यांवर पट्टी बांधताना दिसतो. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधण्यात आली होती.

(हे ही वाचा: सिंहाने पाणी पीत असलेल्या हरणावर केला हल्ला आणि…;बघा व्हायरल व्हिडीओ)

नक्की काय केलं ?

चाउमीन बनवण्यासाठी त्याने प्रथम कोबी कापला आणि पॅनमध्ये फ्राई केलं. मग नूडल्स आणि सॉस घालून प्लेटमध्ये सर्व्हही केलं. सर्व्ह करण्यापूर्वी, त्याने कोथिंबीरच्या पानांनी दिशला सजवलेही. हा व्हिडीओ इंदूरमधील साई कृपा चायनीज सेंटरचा आहे.

(हे ही वाचा: स्टंट करण्याच्या नादात तरुणीने कॅमेरामॅनवरच चढवली स्कूटी; Video Viral)

(हे ही वाचा: Viral Video: स्वर्गासारखे हे सुंदर दृश्य पाहून तुम्हीही मंत्रमुग्ध व्हाल!)

शेअर केल्यानंतर हा व्हिडीओ आतापर्यंत ६० हून अधिक वेळा पाहिला गेला आहे. लोक या व्यक्तीच्या टॅलेंटची प्रशंसा करत आहेत. यासोबतच अनेक कमेंट्सही केल्या जात आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Noodles made by blindfolded person netizens were shocked to see the video ttg

ताज्या बातम्या