Nothing Phone 3 price : तु्म्हालाही जर नवीन मोबाईल घ्यायचा असेल तर नथिंग या स्मार्टफोन ब्रँडने आपला नवा स्मार्टफोन Nothing Phone 3 भारतात अधिकृतपणे लाँच केला आहे. परवडणाऱ्या किंमतीत आयफोन, वनप्लसशी स्पर्शा करणारा फोन शोधत असाल तर ही अपडेट तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. तब्बल दोन वर्षांनी ‘फोन 2’ नंतर नवा ब्रँड म्हणून आलेल्या या हायएंड डिव्हाइसमध्ये अनेक महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे कंपनीने यावेळी आपली ओळख ठरलेली Glyph Interface काढून टाकत एक नव्या प्रकारची Glyph Matrix प्रणाली सादर केली आहे.
किंमत, रंग
- Nothing Phone 3 भारतात दोन स्टोरेज व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे:
- १२GB RAM + २५६GB स्टोरेज: ७९,९९९ रुपये
- १६GB RAM + ५१२GB स्टोरेज: ८९,९९९ रुपये
फोन ब्लॅक आणि व्हाईट या दोन आकर्षक रंगांमध्ये मिळेल. विक्री १५ जुलैपासून Flipkart, Vijay Sales, Croma आणि अन्य रिटेल स्टोअर्समध्ये सुरू होणार आहे.
डिस्प्ले व बॅटरी
फोनमध्ये ६.६७ इंचांचा फлексिबल AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, जो Corning Gorilla Glass Victus ने संरक्षित आहे. यामध्ये १२०Hz रिफ्रेश रेट आणि ४,५०० निट्सची पीक ब्राइटनेस आहे, त्यामुळे सूर्यप्रकाशातही स्क्रीन स्पष्टपणे दिसतो.५,१५०mAh क्षमतेची बॅटरी या फोनला ऊर्जा देते. ती ६५W फास्ट चार्जिंग, १५W वायरलेस चार्जिंग, आणि ७.५W रिव्हर्स वायर्ड चार्जिंग ला सपोर्ट करते.

कॅमेरा
Nothing Phone 3 मध्ये ५०MP मुख्य कॅमेरा, 50MP पेरिस्कोप झूम कॅमेरा, आणि ५०MP अल्ट्रा-वाइड लेन्स अशी तिहेरी कॅमेरा रचना देण्यात आली आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठीही ५०MP फ्रंट कॅमेरा दिला गेला आहे, ज्यामुळे युजर्सना प्रोफेशनल दर्जाचे फोटो मिळतील.