ऑफिसची वेळ संपल्यानंतरही तुमचा बॉस तुम्हाला कामाच्या संदर्भात कॉल, मेसेज किंवा ई-मेल करतो का? ऑफिसमधून आलेले कॉल, मेसेज आणि ई-मेल्स तुमच्या वैयक्तिक आयुष्यात होतो? पण आता एका देशातील कर्मचाऱ्यांना याबद्दल काळजी करायची गरज नाही.जर तुम्ही पोर्तुगालमध्ये रहात असाल तर वर नमूद केलेली गोष्ट तुम्हाला आणि तुमच्या बॉसला पूर्णपणे लागू होते. तुम्ही भारतासारख्या देशात राहत असाल तर तुम्हाला आता बॉसची ही वागणूक सहन करावी लागेल. तरीही पोर्तुगालची ही बातमी तुम्हाला मन:शांती देईल.

का लागू करण्यात आला हा कायदा?

पोर्तुगालच्या संसदेने एक नवीन कायदा संमत केला आहे, जो निरोगी कार्य जीवन संतुलनास समर्थन देण्यासाठी डिझाइन केलेला आहे. पोर्तुगालच्या सत्ताधारी समाजवादी पक्षाने सांगितले की, कोविड-१९ साथीच्या आजारानंतर घरून काम करण्याचे प्रमाण वाढल्यानंतर नवीन कायद्यांना मान्यता देण्यात आली आहे.

( हे ही वाचा: एकेरी धाव घेण्यास नकार देणाऱ्या डॅरिल मिशेलने आपल्या वक्तव्यानं जिंकली चाहत्यांची मनं; म्हणाला, “मला वाद…” )

काय आहे कायदा?

नवीन नियमांनुसार, कामाच्या वेळेपूर्वी किंवा नंतर कर्मचाऱ्यांशी संपर्क साधल्यास अधिकाऱ्यांना शिक्षा होऊ शकते. इतकंच नाही तर घरून काम केल्यामुळे होणारा खर्च (जसे की वाढीव वीज बिल आणि इंटरनेट बिल) कंपन्यांना भरावा लागणार आहे.

कायद्याला आहेत मर्यादा

मात्र, या कायद्यालाही काही मर्यादा आहेत. जर एखाद्या कंपनीत १० पेक्षा कमी कर्मचारी असतील तर हा नियम त्या कंपनीला लागू होत नाही. नवीन नियमांनुसार कामाच्या तासांव्यतिरिक्त कंपनीवर दंडही आकारला जाऊ शकतो.

( हे ही वाचा: स्वस्त आणि जास्त मायलेज देणारी नवीन मारुती सेलेरियो कार भारतात लाँच! )

या कायद्यातील सर्व काही कर्मचाऱ्यांच्या बाजूने झाले असे नाही. येथील खासदारांनी ‘राइट टू डिस्कनेक्ट’ अर्थात कामाच्या वेळेनंतर मेसेज आणि फोन बंद करण्याची सूचना नाकारली. नवीन नियमांमुळे लहान मुलांचे पालक असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे. असे पालक आता त्यांचे मूल आठ वर्षांचे होईपर्यंत घरून काम करू शकतात.