कर्नाटक राज्यात लवकरच शिक्षक भरती परीक्षा होणार आहेत. या परीक्षेसाठीचे ओळखपत्र जारी झाले असून याचदरम्यान एक खळबळजनक गोष्ट समोर आली आहे. राज्याच्या शिक्षण विभागाकडून एक गोंधळ झाला आहे. राष्ट्रीय कॉंग्रेस कर्नाटकचे अध्यक्ष बी. आर. नायडू यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या पोस्टमधून ही गोष्ट समोर आणली आहे. त्यांनी केलेल्या पोस्टमध्ये एक फोटो शेअर करण्यात आला असून यामध्ये एका विद्यार्थ्याच्या ओळखपत्रावर सनी लिओनीचा आक्षेपार्ह फोटो लावण्यात आला आहे. या ट्वीटमध्ये नायडू यांनी कर्नाटकचे शालेय शिक्षण मंत्री बी सी नागेश यांना टॅग करून भाजपावर निशाणा साधला आहे.

नायडू यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय, “शिक्षकांच्या भरतीसाठी देण्यात आलेल्या एक ओळखपत्रात उमेदवाराच्या फोटोच्या जागी अश्लील चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रीचा फोटो छापला गेला आहे. संसदेत अश्लील चित्रपट पाहणाऱ्या पक्षाकडून आपण आणखी काय अपेक्षा ठेवू शकतो?” यावेळी नायडू नागेश यांना म्हणाले की, ‘तुम्हाला असे अश्लील चित्रपट पाहायचे असतील तर पाहा, पण यासाठी शिक्षण विभागाचा वापर करू नका.’

ड्रायव्हिंग टेस्ट आहे की चक्रव्यूह? वाहनचालकाचे भन्नाट कौशल्य पाहून तुम्हीही चक्रावून जाल; Viral Video एकदा पाहाच

दरम्यान, बी सी नागेश यांच्या कार्यालयाकडून यासंबंधी विधान करण्यात आले आहे. यामध्ये म्हटल्याप्रमाणे, ‘उमेदवाराला ओळखपत्रामध्ये स्वतःचा फोटो अपलोड करायचा असतो. सिस्टीम फाइलमध्ये जो कोणी फोटो जोडतो, तेच फोटो सिस्टीम अपलोड करते.’ संबंधित महिला उमेदवारालाही याबाबत प्रश्न विचारण्यात आले. त्यावर उमेदवार म्हणाली की तिच्या पतीच्या मित्राने तिचे तपशील भरले होते.

धक्कादायक! विद्यार्थिनीच्या प्रेमात पडलेल्या PT च्या महिला शिक्षिकेने लिंगपरिवर्तन शस्त्रक्रिया करुन…

याच पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने प्राथमिक तक्रार नोंदवली असून आता या प्रकरणाचा सखोल तपास केला जात आहे.