scorecardresearch

दुर्दैवी! पोलीस बनण्यासाठी गेला तो परतलाच नाही, शारीरिक चाचणीदरम्यान जीव तोडून पळाला पण…

१६०० मीटर शर्यतीत धावताना तरुण जमीनीवर कोसळला.

odisha police recruitment
अनेक तरुण पोलीस भरतीसाठी दिवसरात्र मेहनत घेत असतात. (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

अनेक तरुण पोलीस भरतीसाठी दिवसरात्र मेहनत घेत असतात. भरतीसाठी सर्वात महत्वाची चाचणी असते ती म्हणजे शारीरिक चाचणी, त्यामुळे भरती होण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांना जीव तोडून पळावं लागतं हे आपणाला माहिती आहे. पण सध्या ओडिशातील गंजाम जिल्ह्यात एका २० वर्षीय तरुणाचा भरतीसाठी धावत असताना अचानक मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे.

हेही वाचा- एकाचवेळी २ सायकल पळवणाऱ्या व्यक्तीचा Video व्हायरल, अनोखा जुगाड पाहून तुम्हीही व्हाल थक्क

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना छतरपूर येथे घडली आहे. दीप्ती रंजन दास असं या तरुणाचे नाव असून तो छतरपूर येथे कॉन्स्टेबल पदाच्या भरतीसाठीची शारीरिक चाचणी देण्यासाठी आला होता. यावेळी १६०० मीटरच्या शर्यतीदरम्यान तो पडला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. एका वृत्तसंस्थेनुसार, दीप्ती रंजन श्यामसुंदरपूर भागातील रहिवासी होता. ओडिशा पोलिस भरतीसाठीची लेखी परीक्षा तो पास झाला होता. शनिवारी तो छतरपूर येथील पोलीस राखीव मैदानावर पुढील फेरीसाठी म्हणजेच शारीरिक चाचणीसाठी आला होता. यावेळी तो १६०० मीटर शर्यतीत धावताना बेशुद्ध होऊन जमीनीवर कोसळला.

हेही वाचा- चक्क हवेत तरंगतोय दगड? व्हायरल फोटोमागील वास्तव समजल्यावर तुम्हीही व्हाल थक्क

दीप्ती रंजन खाली पडताच त्याला तात्काळ छतरपूर येथील एमकेसीजी रुग्णालयात नेण्यात आलं, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. गंजामचे एसपी जगमोहन मीणा यांनी सांगितले की, शारीरिक चाचणीपूर्वी त्यांच्या तब्येतीची तपासणी करण्यात आली, ज्यामध्ये तो तंदुरुस्त असल्याचं आढळलं. मात्र, शर्यतीदरम्यान तो अचानक बेशुद्ध होऊन खाली कोसळला, सध्या त्यांचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला असून त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होईल. दरम्यान, दीप्ती रंजनच्या मृत्यूची बातमी त्याच्या घरच्यांना समजताच त्यांना मोठा धक्का बसला. आपल्या मुलाला पोलिसात भरती व्हायचे होते, पण तो आम्हाला असा कायमचा सोडून जाईल हे माहीत नव्हतं असं दीप्ती रंजनचे कुटुंबीय म्हणाले.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-03-2023 at 17:14 IST

संबंधित बातम्या