‘ऊपर वाला जब देता, देता छप्पर फाड के’ असं म्हणतात. कारण, एखाद्या व्यक्तीचं नशीब कधी पालटेल हे सांगता येत नाही. अशीच एक घटना समोर आली आहे. ज्या घटनेत एका ट्रकमधील डिझेल संपल्याचं निमित्त झालं आणि महिलेचं नशीब पालटलं आहे. शिवाय या महिलेने एक दोन कोटी नव्हे तर तब्बल आठ कोटी रुपये एका झटक्यात जिंकले आहेत. त्यामुळे आता देणारा देताना छप्पर फाड के देतो यावर तुमचाही विश्वास बसणार आहे.

आश्चर्याची बाब म्हणजे या महिलेचं नशीब पालटण्यासाठी एक ट्रक कारणीभूत ठरला आहे. हो कारण ट्रकमधील डिझेल संपलं म्हणून एक महिला डिझेल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर गेली आणि तिथे तिने एक लॉटरीचं तिकीट खरेदी केलं, नशिबाने तिने घेतलेल्या नंबरचीच लॉटरी लागली. त्यामुळे ही महिला काही मिनिटांमध्ये ८ कोटींची मालकीन बनली. शिवाय या महिलेने लॉटरी जिंकण्याचं श्रेय ट्रकच्या डिझेल संपण्याला दिलं आहे. या घटनेच वृत्त आजतकने दिलं आहे.

हेही वाचा- बायकोच्या मृत्यूनंतर टॅक्सी चालकाने असं काही केलं की…, रात्रीत बनला करोडपती

मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिना येथे राहणाऱ्या लॉरा कीन नावाची महिला तिच्या जोडीदारासोबत ख्रिसमसनिमित्त काही वस्तूंची खरेदी करण्यासाठी ट्रकमधून निघाली होती. खरेदीला जात असताना ट्रकमधील तेल संपत आल्याने इंडिकेटर लाइट चमकू लागली.

त्यामुळे लॉरा नॉर्थ कॅरोलिना येथील केर्नर्सविले येथील 7-Eleven गॅस स्टेशनवर ट्रकमध्ये डिझेल भरण्यसाठी गेली. डिझेल भरेपर्यंत लॉराने ‘$30 मिलियनेअर मेकर स्क्रॅच-ऑफ तिकीट’ या लॉटरीचे एक तिकीट विकत घेतलं आणि अवघ्या काही मिनिटांनी तिला समजलं की, तिने या लॉटरीत ८ कोटीहून अधिकची रक्कम जिंकली आहे. ही घटना तिला आणि तिच्या प्रियकराला समजताच दोघांनी एकच जल्लोष केला, त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही.

हेही वाचा- Ludo च्या नादात नवऱ्याला कंगाल करुन बाईने स्वतःचीच लावली बोली; आता नाईलाजास्तव घरमालकासोबत…

तेल संपले म्हणून मिळाले पैसे –

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लॉटरीचे बक्षीस जिंकल्यानंतर लॉरा म्हणाली की, ‘मला खूप आश्चर्य वाटतंय की मी कसल्या परिस्थितीमध्ये लॉटरी जिंकली. जर त्यादिवशी ट्रकमधील तेल कमी झाल्याच्या गोष्टीकडे लक्ष दिलं नसते तर कदाचित मी लॉटरीचे तिकीट कधीच विकत घेतलं नसतं.’ त्यामुळे या बक्षीस जिंकण्याचं श्रेय आपण तेलाच्या कमतरतेला देत असल्याचंही ती म्हणाली. दरम्यान, लॉरा प्रमाणे याआधीही नॉर्थ कॅरोलिना येथील मार्सिया फिनीनेही अशाच पद्धतीने लॉटरी जिंकली होती. ती एका फूड शॉपमध्ये चिप्स घेण्यासाठी गेली असता तिने २००० रुपयांचे एक लॉटरीचे तिकीट खरेदी केले. लॉटरीत तिने तब्बल ५७ लाख रुपये जिंकले होते.