मुलांसाठी त्याचे पालक वृद्ध असू शकतात. पण आई-वडिलांसाठी त्याची मुलं कधीच म्हातारी होत नाहीत..! ते त्यांच्या मुलाला नेहमीच लहान आणि लाडका दुलारा समजतात. हे काय असा प्रश्न तुमच्या डोक्यात आला असेल. तर सध्या सोशल मीडियावर एका म्हाताऱ्या आईचा आणि तिच्या मुलाचा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे.

आणखी वाचा : प्रेक्षक बोंबा मारायला लागले म्हणून भरत जाधवने थांबवलं नाटक; महापौरांना केला कॉल अन्…

हा व्हिडीओ डेप्युटी कलेक्टर संजय कुमार यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत म्हाताऱ्या आईला हसवण्यासाठी तिचा मुलगा डान्स करत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत ते म्हणाले, ‘आईसाठी तिची मुलं कधीच मोठी होत नाहीत..!’ या व्हिडिओमध्ये एक वृद्ध माणूस आपल्या आईसमोर ‘तू कितनी अच्छी है, तू कितनी प्यारी है’ असे गाणे गाताना दिसत आहे. एवढचं काय तर त्यासोबत डान्स देखील करताना दिसत आहे. आपल्या मुलाला पाहून ती म्हातारी आई हसू लागते.

आणखी वाचा : गुटखा खाण्याची प्रॅक्टिस! भूमिकेसाठी प्राजक्ता माळीने केली अशी तयारी

आणखी वाचा : लग्नानंतर पतीसोबत तिरुपतीला गेलेली नयनतारा अडकली वादाच्या भोवऱ्यात!

हा मजेशीर व्हिडीओ आता पर्यंत २ लाख पेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट करत त्यां वृद्ध मुलाचे कौतुक केले आहे. ‘आणि एका मुलाला कधीच वाटतं नाही की त्याचे आई-वडील म्हातारे व्हावेत.’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘मी या वयापर्यंत स्वत: च्या आई-वडिलांची सेवा करावी, अशी माझी इच्छा आहे’.