Old Woman Bridge Crossing viral Video : पावसाळा सगळ्यांसाठीच सारखा नसतो. पावसाळ्यात नद्या, नाले, धरणे तुडुंब भरतात आणि मग छोट्या गावांमध्ये, चाळीमध्ये पाणी भरते. एवढेच नाही, तर येण्या-जाण्यासाठीचा रस्ता, ब्रिजची स्थिती व्यवस्थित असेल, तर ठीक; नाही तर मग अगदी तारेवरची कसरत करून, जीव धोक्यात घालून एकेक पाऊल आपल्या सगळ्यांनाच टाकावे लागते. त्यामुळे पावसाळ्यात सामान्य नागरिकांना याचा सगळ्यात जास्त फटका पडून त्यांच्या जीवाचे हाल होताना दिसतात. आज सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओत अशीच काहीशी परिस्थिती पाहायला मिळाली आहे.

व्हायरल व्हिडीओ झारखंडमधील आहे. झारखंडमधील बोकारो जिल्ह्यातील एक वृद्ध महिला नदी ओलांडताना दिसते आहे. पण, नदी ओलांडणाऱ्या या पुलाची परिस्थिती अत्यंत खराब होती. त्यामुळे लोखंडी पुलावरून जाताना ती स्वतःचा तोल सांभाळत सुरक्षितपणे पूल ओलांडण्याचा प्रयत्न करत होती. पण, या पुलाची स्थिती इतकी खराब असते की, चालताना तिच्या एका चुकीमुळे ती नदीत पडली असती किंवा आयुष्यभरासाठी अपंगत्व येण्याचा धोका आजीला होऊ शकला असता…

नदी ओलांडण्यासाठी तारेवरची कसरत (Viral Video)

तुम्ही पाहिले असेल की, सुरुवातीला पुलाची स्थिती नीट असते. पण, जेव्हा आजी चालायला सुरुवात करतात. तेव्हा मात्र दोन्ही पाय एकत्र ठेवता येतील, असा पृष्ठभागच या पुलाला नसतो. फक्त पुलाच्या मध्यभागी गंजलेल्या लोखंडी रॉड तुम्हाला या पुलावर दिसतील. त्या गंजलेल्या प्रत्येक रॉडवर एकेक पाऊल ठेवत, रेलिंगला धरून आजीने संपूर्ण पूल चालून दाखवला. अशा प्रकारे गावकऱ्यांच्या सुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ एकदा तुम्हीसुद्धा बघा…

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @dineshwar_15261 या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ शेअर करून, त्यांनी ‘उपायुक्त @BokaroDc महोदय, व्हिडीओद्वारे बोकारो जिल्ह्यातील परिस्थितीबद्दल सांगितले जात आहे. गावकऱ्यांना ये-जा करण्यात खूप अडचण येत आहे. तुम्ही पाहू शकता की, वृद्ध आजी कशी नदी ओलांडताना दिसत आहे. या प्रकरणाची दखल घ्या- @HemantSorenJMM. परिस्थिती लक्षात घेऊन लवकरात लवकर आवश्यक पावले उचलण्याची विनंती आहे’, अशा कॅप्शनसाहित पोस्ट केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि गावकऱ्यांच्या सुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली. त्यानंतर सोशल मीडियाची ताकद पुन्हा एकदा दिसली आणि बोकारोचे डीसी अजय नाथ झा यांनी जलद दुरुस्तीसाठी विनवणी केली आहे.