चोरीच्या अनेक घटना दररोज घडत असतात. मात्र, यातील काही घटना अशा असतात ज्या सगळ्यांनाच हादरवून सोडतात. तर, काहीवेळा चोर अशा पद्धतीने चोरी करतात की त्याचीच चर्चा रंगते. हल्ली महिलांच्या हातातील मोबाईल फोन जबरदस्तीनं हिसकावून नेण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. पूर्वी चोरांचा सोनसाखळी चोरी करण्यावर भर होता, हल्ली मोबाईल चोरी करण्याच्या बऱ्याच घटना आपण एकल्या असतील, अशाच घटनेचा व्हिडीओ इंदोरमधून समोर आला आहे. चालत्या मोटारसायकलवरून दोन पुरुषांनी एका महिलेचा फोन हिसकावल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे, हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

दिवसाढवळ्या तरुणीचा मोबाईल हिसकावला

इंदोरमध्ये चालत्या मोटारसायकलवरून आलेल्या दोन पुरुषांनी एका तरुणीच्या हातातून तिचा फोन हिसकावला, त्यानंतर ती रस्त्यावर पडली. या व्हिडीओमध्ये तु्ही पाहू शकता, एक महिला रस्त्यावरुन दिवसाढवळ्या फोनवर बोलत जात आहे, याच दरम्यान दोघेजण मागून मोटरसायकलवर येतात आणि तिचा मोबाईल हिसकावून पळून जातात. यावेळी चकित झालेल्या महिलेने फोन धरण्याचा प्रयत्न केला मात्र तिला धक्का देत ते पसार होतात, यादरम्यान महिला खाली पडतो.

यात महिला किरकोळ जखमी झाली असून हा सर्व प्रकार इंदूरच्या तुकोगंज भागातील उच्च न्यायालयाच्या इमारतीजवळ दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडला आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – स्वस्तात मस्त ऑनलाईन शॉपिंग करताय? हे बघा मागवलं एक अन् आलं भलतंच, Video पाहून लावाल डोक्याला हात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यानंतर याची तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला यावेळी पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना चोरटे देखील दुचाकीवरुन पडले आणि त्यांना अटक करण्यात आली.