Vicky Kaushal Video: अबुधाबीमध्ये आयफा अवॉर्ड्स २०२२ (IIFA Awards 2022 ) मध्ये अनेक बॉलिवूड स्टार्सनी हजेरी लावली होती. यावेळीही अनेक सिनेतारकांनी पुरस्कार घरी नेले. या स्टार्समध्ये बॉलीवूड अभिनेता विकी कौशलच्या नावाचाही समावेश आहे. विकी कौशलला आयफा अवॉर्ड्समध्ये ‘सरदार उधम सिंग’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला. या अवॉर्ड शोदरम्यान विकी कौशलचे दुसरे लग्नही लावून देण्यात आले. अखेर विकी कौशलने पुन्हा लग्न का केले, जाणून घेऊया.
विकी कौशलच्या लग्नाची मिरवणूक
लग्नानंतर अभिनेत्याचा हा पहिलाच अवॉर्ड शो होता. या फंक्शनमध्ये विकी एकटाच पोहोचला पण त्याने एकट्यानेच सगळी लाइमलाइट लुटली. या अवॉर्ड शोमध्ये विकी कौशलची मिरवणूक काढण्यात आली आणि या मिरवणुकीत त्याचे आई-वडीलही सहभागी झाले होते. व्हायरल झालेल्या मजेशीर व्हिडीओमध्ये दिसत की विकीच लग्न पुन्हा एकदा कतरिनासोबत लाऊन देण्यात आलं. फक्त यावेळी तिथे कतरिना प्रत्यक्षात न्हवती तर तिचं पोस्टर होत. त्या पोस्टराच विकीने हार घातला आणि लग्न केले.
(हे ही वाचा: चंद्रमुखीची क्रेझ कायम! ‘चंद्रा’ गाण्यावर मुलाने केलेला ‘हा’ भन्नाट डान्स एकदा बघाच; Video Viral)
(हे ही वाचा: पाणी पिणाऱ्या सिंहाला ‘या’ व्यक्तीने मागून ढकलायचा केला प्रयत्न अन्; Video Viral)
आयफा अवॉर्ड्स २०२२ शी संबंधित अनेक व्हिडीओ आणि फोटो समोर येत आहेत. हे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशातच आता विकीच्या लग्नाचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे आणि लोकांच्या पसंतीसही उतरत आहे.