सोशल मीडियावर पावसाळी पर्यटनाचे कित्येक चित्तथरारक व्हिडिओ समोर येत असतात. उंच डोंगरांवरून वाहणारे धबधबे, हिरवागार निसर्ग, रिमझिम पाऊस…..हे पावसाळी दृश्य पाहण्यासाठी लोक सुंदर सुंदर ठिकाणी भेट देतात. अशाठिकाणी भेट देताना अत्यंत सावधगिरी बाळगावी लागते कारण पाण्यामुळे तेथील खडक गुळगुळीत झालेले असतात ज्यावरून सहज कोणाचाही पाय घसरू शकतो. तसेच अचानक पाण्याची पातळी वाढण्याचा धोका असतो. असा परिस्थितीमध्ये उगाच नको ते धाडस दाखवणे एखाद्याच्या जीवावर बेतू शकते. अशाच एका घटनेचा व्हिडिओ सध्या चर्चेत आला आहे. व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांच्या काळाजाचा ठोका चुकत आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये जमिनीपासून कितीतरी फुट उंच अशा या धबधब्यावरून दरीमध्ये धो धो पाणी कोसळताना दिसत आहे. धबधब्या समोरील पठारावरून सुरक्षितपणे हे मोहक दृश्य पाहू शकतात, फोटो काढू शकतात. तरीही एका तरुणाला नको ते धाडस करताना दिसत आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला धबधब्याचे पाण्याच्या बाजूला खडकांवर एक तरुण उभा असल्याचे दिसत आहे. तिथे उभा राहून तो आधी फोटोसाठी पोज देतो. कॅमेरा आधी त्याच्यावर झुम आऊट होताच लक्षात येते कि, तरुण किती धोकादायक ठिकाणी उभा आहे.

काही वेळाने तो खडकांवरून खाली उतरू लागतो. पाय ठेवायलाही जागा नाही अशा ठिकाणावरून तो उतरत आहे जे पाहताना काळजाचा ठोका चूकत आहे. जराशी चूक झाली तर तो थेट दरीमध्ये पडू शकतो. पण तरुणाला त्याची भीती वाटत नसल्याचे दिसते. तो तसाच हळू हळू एका दगडावरून दुसऱ्या दगडावर पाय ठेवत पुढे जात राहतो. एका ठिकाणी येऊन तो थांबत असल्याचे दिसत आहे. तो सुखरूपपणे तेथून बाहेर पडला की नाही हे दाखवले नाही. व्हिडिओ नक्की कुठला आहे आणि कधीचा आहे याबाबतही माहिती मिळाली नाही. व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे.

travelling.shillong नावाच्या पेजवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, तुम्ही मस्करी करत आहात का?कृपया असे कधीही करू नका. धाडस जेव्हा चुकीची कल्पना ठरते.

व्हिडीओवर कमेंट करत अनेकांनी भीती व्यक्त केली. एकाने लिहिले की, व्हिडिओ पाहाताना माझ्या हृदयाची धडधड वाढली होती.

दुसऱ्याने कमेंट केली की,”मला आशा आहे की, तो तरुण सुखरूप परत आला असावा.”

तिसऱ्याने लिहिले की, “नाही, मला उंचीची भिती वाटते.”

चौथ्याने लिहिले की, “भाऊ, माझे हृदय थरथर कापत आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाचव्याने लिहिले, कृपया असे स्टंट करू नका, तुमचं कुटुंब तुमची वाट पाहात आहे,