Optical Illusion: या चित्रात लपलेला आहे एक इंग्रजी शब्द; ज्याला सापडेल, तो ठरेल ‘जीनियस’

या चित्रात एक इंग्रजी शब्द दडलेला आहे, पण तो शब्द शोधण्यात अनेकांना अपयश येत आहे.

An English word hidden in this picture
या चित्राची रचना खूपच तिरकस आहे. (Social Media)

आजकाल डोळ्यांना फसवणारे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या चित्रांची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यात दडलेल्या गोष्टी डोळ्यांच्या समोर असल्या तरीही दिसत नाहीत. असाच एक फोटो सध्या व्हायरल होत आहे. चित्रात एक इंग्रजी शब्द दडलेला आहे, पण तो शब्द शोधण्यात अनेकांना अपयश येत आहे. चित्रात दडलेला हा शब्द सकाळी फिरणाऱ्या लोकांच्या हृदयाच्या खूप जवळ आहे.

तुम्हाला चित्रात चार अक्षरी इंग्रजी शब्द शोधावा लागेल. तुम्हाला त्यात दडलेला शब्द ओळखण्यात काही अडचण येऊ शकते, कारण या चित्राची रचना खूपच तिरकस आहे. कुशाग्र बुद्धी असणाऱ्या लोकांना चित्रात दडलेला शब्द शोधण्यात यश आले आहे. तथापि, असे काही लोक आहेत ज्यांना बराच वेळ चित्र पाहिल्यानंतरही त्यात दडलेला शब्द सापडला नाही.

Video: ईडन गार्डन्सवरील ‘जॉन सीना’ चर्चेत; मैदानातील त्याची करामत पाहून कोहलीही क्षणभर झाला स्तब्ध

तुम्ही लाल आणि आकाशी निळ्या तिरकस लाटांचे चित्र पाहत आहात. या लाटांच्या मध्यभागी चार अक्षरी इंग्रजी शब्द लिहिलेला आहे. जर तुम्हाला हा शब्द अजून सापडला नसेल, तर आम्ही तुम्हाला एका हिंट सांगतो की लोक हे काम त्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी सकाळी करतात. आता तुम्ही विचार करत असाल की लोक व्यायामशाळेत जातात किंवा त्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी व्यायाम करतात. पण आम्ही तुम्हाला सांगतो की हा शब्द ‘वॉक’ (WALK) आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Optical illusion an english word hidden in this picture whoever finds it will be a genius pvp

Next Story
Video: ईडन गार्डन्सवरील ‘जॉन सीना’ चर्चेत; मैदानातील त्याची करामत पाहून कोहलीही क्षणभर झाला स्तब्ध
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी