scorecardresearch

Premium

Optical Illusion : तुम्हाला कापलेलं झाड दिसते का? पण हे झाड कापलेलं नाहीच, एकदा नीट क्लिक करून पाहा

सध्या असाच एक ऑप्टिकल इल्यूजनचा व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये एक झाड कापलेलं दिसत आहे. पण हे झाड कापलेलं नाही. तुम्हाला वाटेल हे कसं शक्य आहे, पण हे खरंय. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ नीट क्लिक करून पाहावा लागेल.

optical illusion
तुम्हाला कापलेलं झाड दिसते का? (Photo : Instagram)

Viral Video : सोशल मीडियावरऑप्टिकल इल्यूजनचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. अनेकांना ऑप्टिकल इल्यूजन सोडवायला खूप आवडते पण काही व्हिडीओ इतके कठीण असतात की ऑप्टिकल इल्यूजन सोडवायला कठीण जाते. ऑप्टिकल इल्यूजन हा बौद्धिक चाचणीचा खेळ आहे. ऑप्टिकल इल्यूजनमुळे आपण एखाद्याची बौद्धिक क्षमता ओळखू शकतो. अनेक जण वेळात वेळ काढून ऑप्टिकल इल्यूजन आवडीने सोडवत असतात. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले ऑप्टिकल इल्यूजन कधी खूप कठीण असते तर कधी खूप सोपी असते.

सध्या असाच एक ऑप्टिकल इल्यूजनचा व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये एक झाड कापलेलं दिसत आहे. पण हे झाड कापलेलं नाही. तुम्हाला वाटेल हे कसं शक्य आहे, पण हे खरंय. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ नीट क्लिक करून पाहावा लागेल.
असं म्हणतात, जसं दिसते तसं नसते.. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल, हे खरंय. हे झाड जरी कापलेले दिसत असले तरी हे झाड कापलेले नाही. तुम्ही जेव्हा हा व्हिडीओ पाहाल तेव्हा तुम्हाला यावर विश्वास बसेल.

when spider man come to
स्पायडर मॅन जेव्हा गावाकडे येतो… शेतीचे काम करताना दिसला लहानग्याचा सुपरहिरो, पाहा स्पायडर मॅन शेतकऱ्याचा VIDEO
a couple made beautiful things from vet or cane sticks
कलाकाराबरोबर किंमतीबाबत मोलभाव करू नका! वेताच्या काठीपासून बनवल्या सुंदर वस्तू, व्हिडीओ होतोय व्हायरल
Garlic Use To Throw Bad Cholesterol Out From Body These 6 Lehsun Recipes What is Perfect Time And Way To Eat Garlic Hot or Raw
खराब कोलेस्ट्रॉल शरीरातून बाहेर टाकण्यासाठी लसूण कशी खावी? ‘या’ ६ पद्धतीने रोजचं जेवण करून पाहा
a resident shares shocking video of muddy drinking water flowing from kitchen tap
धक्कादायक! पिण्याचे पाणी इतके गढूळ, नेटकरी संतापले; व्हिडीओ होतोय व्हायरल

हेही वाचा : Jugaad Video : चहा नेहमी उतू जातो? मग हा भन्नाट जुगाड एकदा वापरा, चहा कधीही उतू जाणार नाही…

व्हायरल व्हिडीओ

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक मोठे उंच झाड दिसत आहे. हे झाड कापलेले दिसत नाही. एक रंगकाम करणारा कलाकार तेथे येतो आणि सुरुवातीला झाडाला प्लास्टिक गुंडाळतो. त्यांनंतर त्यावर रंगकाम करतो. तो अशाप्रकारे झाडाला रंगवतो की थोड्या वेळाने तुम्हाला झाड कापलेले दिसते. पण हे झाड कापलेले नाही. या झाडाला असे रंगवले आहे की कुणालाही वाटू शकते की हे झाड कापलेले आहे. या झाडाला सभोतालचा नैसर्गिक रंग दिलेला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. खरं तर रंगकाम करणाऱ्या कलाकाराचे जितके कौतुक करावे, तितके कमी आहे. त्याने खूप सुंदर पद्धतीने झाड रंगवले आहे.

realism.today या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक युजर्सनी या रंगकाम करणाऱ्या कलाकाराचे कौतुक केले आहेत. एका युजरने लिहिलेय, “व्हिडीओच्या शेवटी मी नि:शब्द झालो.” तर एका युजरने लिहिलेय, “खूप छान” आणखी एका युजरने लिहिलेय, “अप्रतिम”

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Optical illusion do you see a cutting tree but this tree is not cut watch viral video amazing art on tree ndj

First published on: 11-12-2023 at 17:29 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×