scorecardresearch

Video:’या’ फोटोत दडलंय रहस्य, व्हिडीओ पाहिल्यानंतर होईल उलगडा

सोशल मीडियावर अनेक प्रकारचे ऑप्टिकल इल्युजन फोटो व्हायरल होत असतात. हे फोटो पाहताना संभ्रम निर्माण होतो.

Make_Up
Video:'या' फोटोत दडलंय रहस्य, व्हिडीओ पाहिल्यानंतर होईल उलगडा

सोशल मीडियावर अनेक प्रकारचे ऑप्टिकल इल्युजन फोटो व्हायरल होत असतात. हे फोटो पाहताना संभ्रम निर्माण होतो. फोटोत नेमकं काय आहे? असा प्रश्न पडतो. असाच एक फोटो सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. अद्भुत कला पाहून लोकं कौशल्याचं कौतुक होतात. मेकअप ट्युटोरियलचा व्हिडीओ पाहिल्यानंतर आश्चर्याचा धक्का बसतो. मेकअप आर्टिस्टने कागदावर किंवा कपड्यांवर नाही तर स्वतःच्या चेहऱ्यावर चित्र काढले आहे, ते चित्र पाहिल्यानंतर काही क्षण काय चालले आहे ते समजत नाही. मेकअप पाहिल्यानंतर संभ्रम दूर होतो.

चित्रात दिसत असलेल्या मुलीमध्ये एका मुलीचा चेहरा लपलेला आहे. मेकअप आर्टिस्टने इतका जबरदस्त मेकअप केला आहे, जो पाहिल्यानंतर लोकांचा गोंधळ उडतो. या पोस्टमध्ये एक व्हिडीओ देखील आहे, जो पाहिल्यावर चित्राचा उलगडा होतो. मेकअप आर्टिस्टने चार डोळे काढले आहेत. खऱ्याखुऱ्या डोळ्यांची उघडझाप होते. तर रेखाटलेले डोळे आहे तसेच राहतात. तर नाक आणि ओठांना काळ डिप शेड रंग दिल्याने ते दिसत नाही. पण बारकाईने बघितल्यावर कळतं की खोलगटपणा येण्यासाठी तसं केलं आहे. तर डाव्या गाळावर ओठ आणि नाक हुबेहुब रेखाटलं आहे.

हा फोटो सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होत आहे. हा फोटो इंस्टाग्रामवर beautyblizz0 नावाच्या युजरने शेअर केला आहे. या फोटोला आतापर्यंत हजारो लाईक्स मिळाले आहेत. त्याचबरोबर या फोटोवर अनेक युजर्सनी कमेंट देखील केल्या आहेत. तसेच फोटो वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Optical illusion makeup by artist photo video viral rmt

ताज्या बातम्या