Optical Illusion : सोशल मीडियावर सध्या ऑप्टिकल इल्यूजन पर्सनॅलिटी टेस्टची क्रेझ आहे.ऑप्टिकल इल्यूजनचे अनेक फोटोज आणि व्हिडीओज हे सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यातून आपल्याला अनेकदा मनोरंजन वाटतं असते. हे ऑप्टिकल इल्यूजन एकप्रकारे आपले व्यक्तिमत्त्व ओळखण्यासही आपल्याला मदत करते. त्यातून एक फोटो सध्या सगळीकडेच व्हायरल होतो आहे. हे ऑप्टिकल इल्यूजन आपल्यालाही आपले विचार कसे आहेत हे तपासून घेण्यास मदत करतात. आपले निरीक्षण आणि आपली बुद्धी किती चोख आहे किंवा आपण कशाप्रकारे विचार करतो याकडेही हे ऑप्टिकल इल्यूजन लक्ष वेधतात. आता असाच एक फोटो आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. या फोटोमध्ये तुम्हाला बर्फात लपून बसलेला बिबट्या शोधायचा आहे. आणि यासाठी तुम्हाला फक्त ४ सेंकदाचा वेळा आहे. मग स्विकारणार का हे चॅलेंज? बघा जमतंय का..
हेही वाचा – Optical Illusion : या निसर्गरम्य चित्रात लपली आहे एक मुलगी; क्लिक करून एकदा नीट पाहा..
तुम्हाला या फोटोत अजूनही बिबट्या दिसला नसेल तरी काळजी करु नका आम्ही तुम्हाला ते शोधण्यासाठी मदत करु. ९९ टक्के लोकांना याचं उत्तर सापडलेलं नाही.
हे पहा इथे लपून बसलाय बिबट्या –

हेही वाचा – व्हायरल Optical Illusion पाहून तुम्हाला चक्कर येईल! तुम्ही ‘या’ फोटोतील वक्र रेषा शोधू शकता का?
खडक आणि बिबट्याचा रंग सारखाच असतो. यामुळेच तुम्हाला बिबट्या सहज दिसणार नाही. पण आता तुम्हाला नक्कीच बिबट्या दिसला असणार, मग आता हे कोडं तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि पाहा त्यांना तरी हे कोडं सोडवता येतंय का ते.
सौरभ देसाई नावाच्या युजरने इंस्टाग्राम अकाउंटवरून हा फोटो शेअर केला आहे. या फोटोवर युजर्सनी ऑप्टिकल इल्यूजन सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक युजर्सनी खरे उत्तर दिले आहे.