OYO CEO Ritesh Agarwal Salary: ओयोचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, रितेश अग्रवाल यांच्या पगारात मागील आर्थिक वर्षात ५.६ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. NDTV च्या माहितीनुसार, २९ वर्षीय अग्रवाल यांच्या वेतनात मागील वर्षाच्या तुलनेत २५० टक्क्यांनी वाढ झाली आहे, याबद्दल ओयोतर्फे सोमवारी बाजार नियामक सेबीकडे अधिकृत माहिती दाखल करण्यात आली आहे. (विद्यार्थ्यांनो, पार्ट टाइम जॉब शोधताय? ‘या’ ऑनलाईन कामातून भरघोस कमाईची संधी)

करोना काळात १००% पगार कपात

प्राप्त माहितीनुसार २०१९ मध्ये ओयो सिंगापूरचे जागतिक मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून अग्रवाल यांची नियुक्ती झाली होती. यानुसार त्यांना घर व वार्षिक १.०६ कोटी रुपयांचे मानधन देण्याचे ठरले होते. त्यांनतर २०२१ मध्ये त्यांना ४.४५ कोटींची पगारवाढ देण्यात आली. एप्रिल २०२० मध्ये करोना काळात रितेश अग्रवाल यांनी स्वेच्छेने उर्वरित वर्षासाठी आपल्या पगारात १०० टक्के कपात करत असल्याची घोषणा केली होती.

अभिमानास्पद! नेत्रहीन सॉफ्टवेअर इंजिनिअरला Microsoft कडून मोठी ऑफर; पगार ऐकाल तर व्हाल थक्क

ग्लोबल हॉस्पिटॅलिटी सर्व्हिसेस प्लॅटफॉर्म ओयोने बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाकडे आधी माहिती सादर करून नवीन आर्थिक दस्तऐवज दाखल केले आहेत. यातील तपशिलांनुसार, कंपनीने कर्मचार्‍यांच्या पगार आणि बोनसच्या खर्चात लक्षणीय कपात केल्याचे दिसून येत आहे. परंतु मुख्य कार्यकारी अध्यक्ष रितेश अग्रवाल यांच्या संपत्तीत कमाल वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष २०२१ मध्ये अवघी १.६ कोटी रुपयांची वाढ झाली होती त्यातुलनेत यंदाची ५.६ कोटींची वाढ ही लक्षणीय आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, कंपनीसाठी कर्मचारी स्टॉक ऑप्शन (ESOP) खर्च ३४४ टक्के वाढून २०२१ च्या आर्थिक वर्षातील १५३ कोटी रुपयांच्या तुलनेत २०२२ मध्ये ६८० कोटी रुपयांवर पोहोचला आहे.