भारताचा शेजारील देश पाकिस्तान १४ ऑगस्ट हा त्यांचा स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहे. त्यानिमित्ताने दुबईतल्या जगातील सर्वांत उंच इमारत असलेल्या ‘बुर्ज खलिफा’वर पाकिस्तानचा राष्ट्रध्वज फडकवला जाईल, अशी अपेक्षा पाकिस्तानी जनतेला होती; पण झाले असे काही की, जे पाहून पाकिस्तानी जनता निराशच झाली आहे. ट्विटरवर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे; ज्यात पाकिस्तानी नागरिकांबरोबर कसा जबरदस्त प्रँक झाला हे दिसतेय. अनेक सोशल मीडिया अकाउंटरवर हा व्हिडीओ आता मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. काही युजर्सनी या व्हिडीओचा पुरेपूर आनंद घेतला. तर काहींनी, शेजारच्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्याबद्दल अभिनंदन म्हटले आहे.

‘बुर्ज खलिफा’वर फडकलाच नाही पाकिस्तानी राष्ट्रध्वज

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये जगातील सर्वांत उंच इमारत ‘बुर्ज खलिफा’ पाहू शकता; जिच्याभोवती अनेक लोक जमलेले आहेत. दुबईतील बुर्ज खलिफाजवळ जमलेल्या या लोकांना दाखवत एक महिला म्हणतेय की- होय, १२ वाजून १ मिनीट झाले; पण दुबईच्या लोकांनी सांगितले आहे की, ‘बुर्ज खलिफा’वर पाकिस्तानचा राष्ट्रध्वज फडकवला जाणार नाही.. ही स्थिती आहे आमची. त्याच वेळी अनेक लोक ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा देतानाही ऐकू येत आहेत. त्यानंतर ही महिला सांगते की, सध्या पाकिस्तानी लोक येथे घोषणा देत आहेत; परंतु बुर्ज खलिफावर पाकिस्तानचा राष्ट्रध्वज फडकवला गेला नाही. सो सॅड…पाकिस्तानी लोकांबरोबर प्रँक झाला.

हा व्हिडीओ @MeghUpdates या ट्विटर अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे . त्याच्या कॅप्शनमध्ये दुबईमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड प्रँक झाला! म्हणत ‘पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन’ असा इंग्रजी हॅशटॅग वापरण्यात आला आहे. आतापर्यंत या ट्विटला ९३ हजारांहून अधिक व्ह्युज आणि साडेतीन हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. अनेक युजर्स यावर प्रतिक्रियाही देत ​​आहेत. व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक युजर्सना हसू आवरणे अवघड होत आहे. तर काहींनी पाकिस्तानी लोकांसह एक जबरदस्त प्रँक झाल्याचे म्हटले आहे.