सोशल मीडियावर काय व्हायरल होईल सांगता येत नाही. एका रात्रीत काही जण स्टार होऊन जातात. तर कधी एक गाण्यावर नाचण्यापासून ते वेगवेगळे चॅलेंज्स दिले जातात. त्यामुळे ठराविक कालावधीत चॅलेंजचं पेव फुटतं आणि सामन्यांपासून सेलिब्रेटीपर्यंत सर्वच चॅलेंज स्वीकारत व्हिडिओ पोस्ट करतात. यावेळी पाकिस्तानातून विचित्र अंडरवेअर चॅलेंज आलं आहे. एक मुलाने याबाबतचा व्हिडिओ टिकटॉकवर अपलोड केला आहे. मात्र काही क्षणात इतर सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकरी मजेशीर कमेंट्सदेखील करत आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हालाही हसू आवरणार नाही.
पाकिस्तानमधील एका मुलाने सोशल मीडियावर अंडरवेअर चॅलेंज संबंधित एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये दोन मुले अंडरवेअर घेऊन उभे असल्याचे दिसते. त्याचवेळी काही अंतरावर असलेला उभा एक मुलगा धावत येतो आणि उडी मारताना दोन्ही पाय अंडरवेअरमध्ये घालतो. २७ नोव्हेंबरला ट्विटरवर शेअर केलेला हा व्हिडिओ आतापर्यंत ९ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. या व्हिडिओला सोशल मीडिया यूजर्सकडून खूप पसंती मिळत आहे. आतापर्यंत १९ हजारांहून अधिक लोकांनी त्याला लाईक केले आहे.
मुलाने हा व्हिडिओ पोस्ट करत बॉलिवूड अभिनेते अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांनाही हे आव्हान दिले आहे. या अंडरवेअर चॅलेंजच्या चर्चा सोशल मीडियावरही रंगत आहेत. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांत सोशल मीडिया यूजर्सही यावर कमेंट करत आहेत. पाकिस्तानमधील एका युजरने या व्हिडिओवर कमेंट करताना लिहिलं आहे की, वाह, माझ्या पाकिस्तानमध्ये खरोखर क्रिएटिव्ह लोक आहेत. त्याचबरोबर हे आव्हान स्वीकारण्यात आणि ते पार पाडण्यातही अनेकजण गुंतले आहेत.