पाकिस्तान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असतं. तिथली लोकं काय करतील अन् काय नाही याचा नेम नाही. दरम्यान, जोधा अकबर चित्रपटातील एक सीन तुम्हाला आठवत असेल. अकबराशी लग्न करताना राणी जोधा हिचे सोन्याचे आणि हिऱ्यांच्या दागिन्यांनी वजन केले होते. असंच काहीसं एका पाकिस्तानी लग्नात पाहायला मिळालं. दुबईत पार पडलेल्या या लग्नाचा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या लग्नात वधूला सोन्याच्या विटांनी तोलले जाते.

७० किलो वीटांसोबत तुला

मात्र, या सोन्याच्या विटा हुंडा म्हणून दिल्या आहेत की नाही, याची खात्री अद्याप झालेली नाही. मात्र, ट्विटरवर पोस्ट केलेल्या या व्हिडिओसोबतच्या कॅप्शनमध्ये वधूचे वजन करण्यासाठी वापरण्यात आलेल्या सोन्याच्या विटा खरे सोने नसल्याचा दावा करण्यात आला आहे. या कॅप्शनमध्ये लिहिले होते की, दुबईतील पाकिस्तानी लग्नाची झलक इंटरनेटवर ट्रेंड होत आहे. वधूच्या वजनाइतके सोन्याचे वजन करण्यात आले. पण सोने खरे नव्हते, जोधा अकबर चित्रपटातील तो सीन लग्नात साकारण्यात आला होता. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये वधू-वर स्टेजवर आले आहेत. या दरम्यान, वधू तराजूच्या एका बाजूला बसते तर दुसऱ्या बाजूल सोन्याच्या विटा ठेवण्यास सुरुवात केली जाते. वधूच्या वजनाच्या समान विटा ठेवल्यानंतर, वर आपली तलवार त्याच्यावर ठेवतो.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – VIDEO: धबधब्यावर रिल बनवताना तरुणाचा पाय घसरला, काही क्षणापूर्वी काढलेला व्हिडीओ अखेरचा ठरला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेकडे लक्ष द्या आधी

इंटरनेटवर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओसोबतच लोकांच्या अनेक प्रकारच्या प्रतिक्रियाही समोर येत आहेत. लोक या व्हिडिओचा निषेध करताना दिसत आहेत. एका वापरकर्त्याने या व्हिडिओवर टिप्पणी केली, हे निंदनीय आहे. पाकिस्तानच्या ढासळत्या आर्थिक स्थितीचं उदाहरण देऊन दुसऱ्या युजरने लिहिले की, पाकिस्तानच्या लोकांकडे एवढे सोने असेल तर पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेकडे लक्ष द्या आधी