Cyclone Biporjoy: बिपरजॉय चक्रीवादळाने पाकिस्तानात थैमान घातलं आहे. येथे अनेक भागांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहेत. वादळाने रौद्र रुप धारण केल्याने आतापर्यंत ३४ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच १४५ जण वादळाच्या तडाख्यामुळे गंभीर जखमी झाले आहेत. बिपरजॉयचा धोका लक्षात घेऊन लष्कर लोकांना सुरक्षित स्थळी हलवत आहे. दरम्यान, पाकिस्तानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये बिपरजॉय चक्रीवादळ कव्हर करताना पाकिस्तानी रिपोर्टर असे काही करतो की, पाहून तुम्हालाही हसू अनावर होईल. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांना ‘चांद नवाब’ आठवला आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, लाईव्ह रिपोर्टिंग दरम्यान रिपोर्टर माईक घेऊन पाण्यात उडी मारतो. एवढेच नाही तर तो पाण्यात डुबकी मारत रिपोर्टिंगही सुरू करतो. या व्हिडिओमध्ये तो पाणी किती खोल आहे हे सांगत आहे, त्यानंतर त्याने अचानक पाण्यात उडी मारली. व्हिडिओमध्ये आजूबाजूच्या लोकांच्या हसण्याचा आवाजही ऐकू येत आहे. अब्दुर रहमान असे या पत्रकाराचे नाव आहे. या पाकिस्तानी रिपोर्टरचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून लोकांना चांद नवाब आठवला आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – लग्नात वऱ्हाडाला मटण कमी पडलं! आणखी मटणाची मागणी केल्याने नवरीनं थेट लग्नच मोडलं

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काही लोक या व्हिडिओवर मजेशीर कमेंट करत आहेत, तर अनेक जण पाकिस्तानी रिपोर्टरची खिल्ली उडवत आहेत. पाकिस्तानी रिपोर्टरचा विचित्र पद्धतीने रिपोर्टिंग करण्याचा व्हिडिओ व्हायरल होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही अनेक पाकिस्तानी पत्रकारांचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. काही महिन्यांपूर्वी जेव्हा पाकिस्तानात पूर आला होता, तेव्हाही एका रिपोर्टरने नाल्यात उडी मारून आपला जीव धोक्यात घालून वार्तांकन केले होते.