Groom And Bride Viral Video : लग्नसराईचा सीजन सुरु झाला असून नवरा-नवरीचे भन्नाट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. लग्नाची वरात असो किंवा हळदी सामरंभातील बॅंडहबाजा नवरा-नवरीला डीजेच्या तालावर थिरकायलाही आवडतं. भर लग्नमंडपात नवरा-नवरीने केलेल्या भन्नाट डान्सचे व्हिडीओही इंटरनेटवर तुफान व्हायरल झाले आहेत. पण आता व्हायरल झालेल्या एका व्हिडीओनं इंटरनेटवर जबरदस्त धुमाकूळ घातला आहे. कारण लग्न सुरु असताना पंडितने नवरीला दिलेल्या मजेशीर सूचना ऐकून भर लग्नमंडपात एकच हशा पिकला. लग्नानंतर नवऱ्याशी कसं वागावं, कोणत्या सूचनांचं पालन करावं, नवऱ्याला आवडणाऱ्या गोष्टींची काळजी घ्यावी, असा कानमंत्रच पंडितने नवरीला दिला. पण पंडितची नवरीला सांगण्याची स्टाईल बघून नवराही जबरदस्त लाजला. लग्न मंडपात असलेले वऱ्हाडीही पंडितच्या डायलॉगबाजीमुळे लोटपोट हसले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पंडितने नवरीला सांगितलं अन् लग्नमंडपात एकच हशा पिकला, पाहा मजेशीर व्हिडीओ

नवरा-नवरी लग्नमंडपात बसलेले या व्हायरल व्हिडीओत पाहायला मिळत आहे. लग्नानंतर नवरीने नवऱ्यासोबत कसं राहायचं, हे पंडित नवरीला सांगण्याचा प्रयत्न करताना व्हिडोओत दिसत आहे. लग्नमंडपात पंडितने सांगितलेल्या सूचना नवरा-नवरी जेव्हा ऐकतात, तेव्हा त्यांनाही हसू आवरत नाही. व्हिडीओच्या सुरुवातीला पंडित म्हणाला, “पतिव्रता धर्म, पतीचा धर्म, पतीने सांगितलेल्या सर्व गोष्टींचं पालन केलं पाहिजे. पतीने जर सांगितलं की, माझे चार मित्र आले आहेत, त्यांना चहा बनव आणि त्यावेळी तू (नवरी) इतर कामात व्यस्त असल्यास नवऱ्याला चहा बनवायला सांगायचा नाही. ठीक आहे ना…मित्रांसमोर नाही बोलणार ना…नवऱ्याला नंतर सांगू शकतेस की अशा माणसं घरी यायला नाही पाहिजेत.”

नक्की वाचा – बापरे! त्या रस्त्यावर पट्टेदार वाघाची दहशत, चक्क दातांनी कारला पाठीमागे खेचलं अन्…थरारक Video एकदा पाहाच

इथे पाहा व्हिडीओ

kailashsingh.bangari नावाच्या युजरने हा मजेशीर व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या नवरा-नवरीचा हा व्हिडीओ इतका मजेशीर आहे की, तुम्ही व्हिडीओ पाहिल्यानंतर पोट धरून हसल्याशिवाय राहणार नाहीत. सोशल मीडियावर व्हिडीओ इतका गाजला की, या व्हिडीओला आतापर्यंत ५३ हजारांहून अधिक व्यूज मिळाले आहेत. व्हिडीओ पाहिल्यानंतर एका नेटकऱ्याने म्हटलं, “पंडितला खूप सतवलेलं दिसतंय.” अन्य एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत म्हटलं,”जर नवरीचे मित्र आले, तर नवऱ्यानेही असंच केलं पाहिजे.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pandit guidance to the bride what to be done with groom after getting married marriage ceremony video goes viral nss
First published on: 18-01-2023 at 13:26 IST