Viral video: एकेकाळी, एप्रिल मे मध्ये प्रत्येक भारतीय घरात पापड बनवण्याची घाई असायची. मात्र आता बदलत्या जीवनशैलीमुळे, घरी पापड बनवण्याची कला लुप्त होत चालली आहे. हल्ली आपण सगळेच थेट दुकानातून पापड आणतो.आपल्या देशांतील कित्येक भागांत दररोज न चुकता शाकाहारी पदार्थांसोबत पापड खाण्याची परंपरा पूर्वापार चालत आली आहे.भारतातील प्रत्येक प्रदेशाची स्वतःची विविधता आहे – दक्षिण भारतीय तांदळाचे पापड, राजस्थानचे बेसन (बेसन) पापड किंवा पंजाबी उडद डाळ पापड. म्हणजे लोणचं आणि पापड हे आपण साईड डिश म्हणून खातो. यामुळे जेवणाची मजा दुप्पट होते. पण फक्त चवीसाठी खाल्ले जाणारे पापड आरोग्यासाठी फायदेशीर आहेत का? तुम्हीही जर विकतचे पापड खात असाल तर थांबा…हे पापड कसे बनतात याची प्रक्रिया पाहून तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल. तसेच या पुढे तुम्हीही पापड खाताना १०० वेळा विचार कराल.
याआधीही अनेकदा अस्वच्छतेबाबत धक्कादायक प्रकरणं समोर आली आहेत, अशातच आता आणखी एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. त्यामुळे यापुढे पापड खाताना सावधान..हा व्हिडीओ पाहून तर तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल. आता तुम्ही म्हणाल असं झालंय तरी काय? तर झालं असं की काही लोक इतक्या अस्वच्छ ठिकाणी हे पापड बनत आहेत की पाहून तुम्हालाही किळस येईल. तुम्हालाही वाटत असेल की हे पापड हाताने लाटून तयार केले जात आहेत. मात्र अक्षरश: हे लोक पापडाचे गोल आकार काढण्यासाठी त्यावर उभे राहत आहेत.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता घराच्या बाहेर अतिशय अस्वच्छ जागेत एक महिला पापडाचं पिठ तयार करतेय. त्यानं स्वच्छतेची कसलीच काळजी घेतलेली नाही. अशाप्रकारे लोकांच्या जीवाशी एकप्रकारे खेळच सुरु असल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही यापुढे बाहेरचं खाताना शंभर वेळा विचार कराल.
पाहा व्हिडीओ
बाजारात आधीच मोठ्या प्रमाणावर आपली फसवणूक होत असते. भेसळयुक्त पदार्थ, प्रक्रिया केलेले पदार्थ खाण्याशिवाय आता आपल्याला पर्याय नाही. कारण आता सर्वच पदार्थांमध्ये भेसळ केली जाते, त्यामुळेच हल्ली आजारी पडण्याचं प्रमाण वाढलं आहे. मात्र समोर आलेला हा प्रकार खरंच भयंकर आहे.