Viral video: सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. यातील काही व्हिडीओ आपल्या मनात घर करून राहतात, तर काही वेळा अशा घटना समोर येतात की त्यावर विश्वास ठेवणंही कठीण होतं. सध्या अशीच एक संतापजनक घटना समोर आली आहे. आई-वडिल आपल्या लेकरासाठी खूप काबाडकष्ट करत असते, पण तेच आई-वडील मुलांच्या जीवावर उठले तर काय? घरातील काही गोष्टींमुळे किंवा पालकांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे त्यांच्यात आपापसात भांडणे होतात. जे की सामान्य गोष्ट आहे. मात्र ही भांडणे मुलांसमोर करणे त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी धोक्याची ठरतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यामध्ये आई-वडिलांच्या भांडणामध्ये मुलांचे कसे हाल होतात हे पाहायला मिळालं आहे. तसेच यामध्ये आईने जे केलं ते पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, नवरा बायको रस्त्याच्या कडेला उभे आहेत. यावेळी गाडीवर एक चिमुकली बसली आहे. तर दुसरं बाळ महिलेच्या कडेवर आहे. यावेळी तिथे असलेला नवरा बायकोच्या जोरात कानाखाली लगावतो. अतिशय अमानुषपणे त्यानं आपल्या बायकोला मारल्याचं दिसत आहे. यावर महिलाही त्याला विरोध करत थेट कडेवर असलेल्या बाळाला खाली फेकते आणि तिथून निघून जाते. यावेळी या पुरुषालाही धक्का बसतो. तो बाळाला उचलतो आणि जवळ घेतो. याठिकाणी दोघा पालकांच्या भांडणामध्ये मुलांवर काय वेळ येते हे पाहायला मिळालं आहे.

पालक जर नियमित आपल्या मुलांसमोर भांडण करत असतील तर, याचा परिणाम मुलांच्या मानसिक आरोग्यावर होतो. काही पालक तर आपल्या वादात मुलांना देखील घेतात, जे पूर्णपणे चुकीचे आहे. यामुळे मुलांच्या मनात गोंधळाची परिस्थिती निर्माण होते. असेच सुरू राहिल्यास पालक आणि मुलं यांच्यातील विश्वास आणि जवळीक कमी होते. पालकांच्या भांडणामुळे मुलामध्ये चिंता, नैराश्य, राग भावना वाढते. ज्यामुळे त्यांची देहबोलीत फरक पडतो. तसेच मुलांचा मोठ्या प्रमाणात आत्मविश्वास कमी होतो.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @gharkekalesh नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय की, “नवरा म्हणून हरलास पण बाप म्हणूनही हरलास”