Virar local video: मुंबईच्या लोकल ट्रेनमधील पुरुष आणि महिलांच्या डब्यात होणारी वादावादी आणि हाणामारी सर्वांनाच माहित आहे. त्यापैकी विरार लोकल या घटनांसाठी कुप्रसिद्धच म्हणावी लागेल. मुंबई लोकल ट्रेनला मुंबईच हृदय म्हणतात. लोकल ट्रेन बंद पडली तर मुंबईच थांबते. चर्चगेटहून वसई- विरारला जाणाऱ्या नागरिकांची संख्या खूप आहे. विरार लोकलला भरपूर गर्दी असते. संध्याकाळच्या वेळी या लोकलमध्ये चढणे खूप मुश्कील असते. सकाळी व संध्याकाळीही लोकलला तुडुंब गर्दी असते. अशी ही मुंबईचा जीव असणारी लोकल ट्रेन सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. विरार लोकलमधला एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये भर गर्दीत कोणा एका प्रवाशाने उलटी केली.याचा किळसवाणा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

किळसवाणा VIDEO पाहून डोकं धराल

विचार करा की विरार लोकलच्या जीवघेण्या गर्दीत तुम्ही चढला आहात आणि नीट उभं राहण्यासाठी लोकलमध्ये खाबांला पकडलं आहे. मात्र त्याच खांबावर कुणीतरी उलटी केली आहे. तुम्हालाही किळस वाटली ना.. सध्या समोर आलेल्या व्हिडीओमध्येही असंच काहीसं झालंय. यावेळी या विरार लोकलमध्ये सिटच्या वरच्या बाजूला जिथे प्रवासी पकडून उभे राहतात त्याच ठिकाणी कुणीतरी उलटी केली आहे. आणि लोकलमध्ये चढणाऱ्या प्रवाशांना त्याची कल्पना नसल्यानं सर्व प्रवशांचे हात त्या उलटीमध्ये खराब होत आहेत. या सगळ्या प्रकारामुळे इतर प्रवासीही हैराण झाले आहेत. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही विरार लोकलमधून प्रवास करताना आता शंभर वेळा विचार कराल.

पाहा व्हिडीओ Passenger vomits in Virar local

View this post on Instagram

A post shared by Virar Magic (@virarmagic)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ virarmagic नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. दरम्यान, हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्याही काळजात धस्स होईल. नेटकऱ्यांना ही घटना अजिबात आवडलेली नाही. त्यांनी यासंबंधीच्या प्रतिक्रिया कमेंट सेक्शनमध्ये नोंदवल्या आहेत. एकानं म्हंटलंय, “खूप भीषण आहे हे सगळं” तर दुसऱ्या एका युजरने “बापरे किती किळसवाणा प्रकार” अशी प्रतिक्रिया दिलीय. तर आणखी एकानं, विरार लोकलची बातच न्यारी, इकडे कधी काय घडेल हे सांगता येणार नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे.