कोट्यावधी राम भक्तांचे स्वप्न असेले राम मंदिराचे स्वप्न अखेर साकार झाले आहे. २२ जानेवारी २०२४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येत श्री रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. मंदिरात प्राणप्रतिष्ठा झाल्यापासून २५ लाखांहून अधिक भाविकांनी मंदिराला भेट दिली आहे. अयोध्येतील विमान आणि रेल्वे सेवांमुळे भाविकांना दर्शनाला येणे सोईचे झाले आहे. अयोध्येत मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली आहे. फक्त देशातच नाही तर विदेशात देखील रामनामाचा गरज होत आहे. मुंबईच्या लोकलपासून विमानापर्यंत राम नावाचा गजर एकायला मिळत आहे. असाच एक व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नक्की या व्हिडिओमध्ये आहे तरी काय, असा सवाल तुम्हालाही पडला आहे का? हा एका विमानातील व्हिडिओ आहे. उडत्या विमानात काही प्रवासी रामनामात दंग झाल्याचं पाहायलं मिळतंय. विमान प्रवासाला अध्यात्मिक अनुभवात रुपांतरीत करत प्रवाशांनी मिळून ‘रघुपती राघव राजा राम’ हे भजन गायले. ते मोठ्या आनंदाने ढोलक वाजवत रामभजन करत आहे.भक्तीभावाने न्हाऊन निघालेल्या प्रवाशांचा उत्साह ओसंडून वाहत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. घटनेचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, युजर्सकडून याचे कौतुक होत आहे.
जमीन, पाणी, हवा या तिन्ही ठिकाणी आता रामनामाची धून ऐकायला मिळतेय. व्हिडिओत विमानात राम सिया राम धून गाताना लोक दिसत आहे. व्हिडिओत एक भाविक राम भजन म्हणत आहे. त्याला विमानात बसलेले इतर लोक प्रतिसाद देत आहे. विमानातील काही जण या क्षणाचा व्हिडिओ बनवत आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> Viral video: कॅब थांबली अन् तिनं दार उघडलं; मात्र पुढे जे झालं ते पाहून तुम्हीही लावाल डोक्याला हात
नेटकऱ्यांनी पाहिला असून अनेकांनी त्यावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. कोणी म्हणतेय, “आता आकाशात सुद्धा राम नावाचा गजर होतोय”, तर कोणी, महागडं तिकिट घेऊन मुंबई लोकलनं प्रवास केल्यासारखं वाटतंय अशी टीका केलीये. असो, विमानात केल्या जाणाऱ्या भजनांबाबत तुमचं मत काय आहे? हे आम्हाला आमच्या सोशल मीडियावर नक्की कळवा..