Peacock Dance Viral Video : शरीराचा चकाकता निळाशार रंग – मोराचे मस्तक व मान गडद निळ्या रंगाने झळकते, ज्यावर सूर्यकिरणांची पडछाया पडली की हा निळसर रंग अधिकच चमकतो. हा निळा रंग केवळ देखणा नसून एक प्रकारचा राजस तेज झळकवतो. इंद्रधनुषी पंखाचा फुलणारा सुंदर पिसारा – मोर पिसारा फुलवतो तेव्हा त्याचे प्रत्येक पंख हे जणू इंद्रधनुष्याच्या रंगांनी सजलेले असतात. हिरव्या, निळ्या, सोनेरी आणि जांभळ्या छटांनी भरलेले हे पिसारे सौंदर्याचं एक जिवंत चित्र वाटतं. त्या पिसाऱ्याच्या शेवटी असलेले “डोळ्यासारखे” चकाकते डिझाईन तर मोराच्या सौंदर्याला गूढता आणि मोहकता देतात. पावलांचा व चालण्याचा डौल – मोर चालताना त्याच्या प्रत्येक पावलात एक विशिष्ट शालीनता आणि रुबाब असतो. त्याची मान वळवण्याची ढबसुद्धा सायासरहित सौंदर्याची प्रचिती देणारी असते.

मोर पृथ्वीवरील सर्वांत सुंदर, विलोभनीय पक्ष्यांपैकी एक आहे. त्याच्या शरीराचा सूर्यकिरणांमुळे चमकणारा सुंदर असा राजसी निळाशार रंग, त्याच्या सौंदर्यात भर टाकणारा इंद्रधनुषी रंगांनी सजलेला त्याच्या पंखांचा फुलणारा सुंदर पिसारा. मोराचं हे सौंदर्य अनेकांना नकळत मोहमयी दुनियेत घेऊन जातं. तुम्ही लहानपणी नाच रे मोरा हे गाणं ऐकलं असेल किंवा तुम्ही ते गाणं कित्येकदा गुणगुणलाही असाल; पण मोराला खरंच तुम्ही कधी पिसारा फुलवून थुई थुई नाचताना पाहिलं आहे का? नसेल, तर आता सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा सुंदर व्हिडीओ तुम्ही एकदा पाहाच. या व्हिडीओत एक मोर चक्क घराच्या छतावर पिसारा फुलवून आवाज करीत नाचण्याचा आनंद घेताना दिसतोय. हे दृश्य पाहून तुमचंही मन प्रफुल्लित होईल.

पावसाची चाहूल लागताच मोर जंगलात पिसारा फुलवून नाचू लागतात; पण शहरातील लोकांना जंगलातील असं हे विहंगम दृश्य प्रत्यक्ष पाहण्याची संधी कधी लाभत नाही. पण, या व्हिडीओत आपल्याला चक्क एका घराच्या छतावर मोर आनंदानं नाचताना दिसतोय. एका इन्स्टाग्राम युजरने मोराचा हा अविस्मरणीय असा मनमोही क्षण आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आहे, ज्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय.

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, पायऱ्यांवर उभी असलेली एक व्यक्ती हातात कुकीचा तुकडा घेऊन घराच्या छतावर जाते. यावेळी तो कॅमेरा जसा छताच्या दिशेने करतो, तेव्हा एक सुंदर मोर पिसारा फुलवून थुई थुई नाचत असतो. यावेळी त्याच्या बाजूला एक लांडोरदेखील हळूहळू नाचू लागते. या प्रेमळ नृत्यातून तो लांडोरीला स्वतःकडे आकर्षित करत होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मोराचा हा मनोहारी व्हिडीओ @ghoomraah नावाच्या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, ज्यावर एका युजरनं लिहिलं, “पृथ्वीवरील सर्वांत भाग्यवान माणूस.” दुसऱ्या युजरनं कमेंट केली, “सुंदर.” तिसऱ्यानं लिहिलं, “आश्चर्यकारक.”