Pakistan Beach Shocking Video : सध्या सोशल मीडियावर एका समुद्रकिनाऱ्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये समुद्रकिनाऱ्यावर सर्वत्र कचऱ्याने ढीग, दुर्गंधी दिसतेय. तरीही त्याठिकाणी हजारो लोक विकेंटचा आनंद घेताना दिसतायत. हा व्हिडीओ पाकिस्तानच्या कराची शहरातील प्रसिद्ध क्लिफ्टन बीचवरील असल्याचे सांगितले जात आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक पुन्हा एकदा पाकिस्तानची खिल्ली उडवत आहेत.

समुद्रकिनाऱ्यावर सर्वत्र कचऱ्याचा ढीग

व्हायरल व्हिडीओत पाहू शकता की, संपूर्ण समुद्रकिनाऱ्यावर कचऱ्याचे ढीग दिसतायत. समुद्रकिनाऱ्यावर प्लास्टिकच्या बाटल्या, खाण्या-पिण्याचे रॅपर आणि भरपूर कचरा पसरलेला दिसतोय. तरीही या घाणीत लोक मजा करताना दिसतायत. काहीजण त्या घाणीत फिरण्याचा आनंद घेतायत. इतकेच नाही तर कचऱ्याच्या या ढिगाऱ्यातही लोक समुद्रकिनाऱ्यावर फोटो काढताना आणि वेळ घालवताना दिसतायत.

पाकिस्तानमधील हा व्हिडिओ @RadioGenoa नावाच्या एक्स अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. जो आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिला तर हजारो लोकांनी लाईक केला. व्हायरल व्हिडिओवर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिली आहे, काही युजर्सनी याला “लज्जास्पद” म्हटले आहे, तर काहींनी प्रशासनाकडे कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एका युजरने व्हिडिओवर कमेंट केली की, “आपण आपल्या निसर्गाशी असे का वागतो? ही आपल्यासाठी लज्जास्पद बाब आहे.” दुसऱ्याने लिहिले की, “पाकिस्तानकडे आता स्वच्छतेसाठी पैसेही शिल्लक नाहीत.” तिसऱ्याने लिहिले की, “या घाणीत फिरणाऱ्या लोकांनी जर कचरा उचलला तर काही दिवसांत समुद्रकिनारा स्वच्छ होईल.”