अनेक भारतीय सकाळच्या किंवा संध्याकाळच्या नाश्त्याला चहा सोबत टोस्ट खाणे पसंत करतात. रस्त्याच्या कडेला चहाच्या स्टॉलवर देखील चहासह अनेकदा टोस्ट विकताना दिसतात. परंतु अलीकडील व्हिडीओ व्हायरल होत असताना, चहा सोबत खाल्ल्या जाणाऱ्या टोस्टला यापुढे खायचा की नाही यावर विचार करायला भाग पाडतो. एकदा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला तुमच्या आयुष्यात टोस्ट कधीही खायचा नाही असा विचार येईल. व्हिडीओमध्ये टोस्ट उत्पादन कारखान्यातील एक कामगार असे काही घाणेरडे करत असल्याचे दाखवले आहे की ते तुम्हाला राग येईलच.
काय आहे व्हिडीओमध्ये?
व्हिडीओमध्ये, कारखान्यातील काही कामगार जमिनीवर ठेवलेल्या टोस्टवर त्यांचे घाणेरडे पाय लावताना दिसत आहेत. एवढेच नाही तर ते टोस्ट पॅक करताना चाटतानाही दिसतात. व्हिडीओमध्ये हे स्पष्ट दिसत आहे की कारखान्याच्या कामगाराने असे कृत्य मुद्दाम केले. व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यापासून, नेटिझन्स कारखाना आणि त्याच्या कामगारांविरोधात संताप व्यक्त करत आहेत.
नेटीझन्सचा संताप व्यक्त
व्हिडीओ GiDDa नावाच्या एका इन्स्टाग्राम अकाऊंटरून शेअर केला गेला आहे. ज्याला आतापर्यंत ३६ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. नेटीझन्स यावर खूश नाहीत आणि व्हिडीओमधील लोकांवर कडक कारवाईची मागणी करत आहेत, काही जण त्यांना अटक करण्याची मागणीही करत आहेत.
बघा व्हिडीओ:
View this post on Instagram
तुम्हाला कसा वाटला हा व्हिडीओ?