Shocking video viral: गेल्या काही दिवसांमध्ये पाळीव प्राण्यांचे आपल्या मालकांवर किंवा अनोळखी व्यक्तींवर हल्ला केल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. पाळी प्राणीही आक्रमक झाल्याचं तुम्ही अनेकदा ऐकलं असेल किंवा तसे व्हिडीओही पाहिले असतील. पाळीव पाळीव म्हणत हे प्राणी कधी आक्रमक होऊन हल्ला करतील याचा काही नेम नसते. आपण पाहिलं असेल की, आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक असतात; ज्यांना प्राणी खूप आवडतात. रस्त्यावरही एखादा कुत्रा, मांजर दिसलं की, हे लोक लगेच त्यांना जवळ जाऊन गोंजारतात, खाऊ घालतात. मात्र, हेच करणं एका महिलेला खूप महागात पडलं आहे. तिनं चक्क अस्वलाला आपल्या मांडिवर घेत त्याला गोंजारत होती. याचवेळी या महिलेसोबत भयानक घडलं. याचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, ही तरुणी अस्वलाच्या पिल्लासोबत खेळत आहे. अस्वही तिच्यासोबत खेळताना दिसत आहे. सोशल मीडियावर रील बनवण्यासाठी फोटो काढण्यासाठी अनेकजण अळाप्रकारे प्राण्यांच्या जवळ जातात मात्र कधी कधी असे अपघात घडतात. या तरुणीनंही असंच या अस्वलाला मांडीवर घेतलं आणि अस्वलानं तिच्यावर अचानक हल्ला केला. हा भयानक हल्ला तुम्ही व्हिडीओमध्ये पाहू शकता.

खेळते खेळता अचानक या अस्वलानं थेट तरुणीच्या चेहऱ्यावर हल्ला केला. त्यानं थेट तिच्या हनुवटीचा चावा घेतला. ही तरुणी संपूर्ण ताकदीनं स्वत:ला सोडवायचा प्रयत्न करत होती. मात्र अस्वलानं तोंडात तिची हनुवटी घट्ट पकडून ठेवली होती.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> पहाट ठरली अखेरची! मॉर्निंग वॉकला गेलेल्या मुलाला ऑटोरिक्षाने चिरडलं, जागीच मृत्यू; थरारक VIDEO व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियात सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. हा व्हिडीओ @animalsinclips या पेवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओला हजारोंमध्ये लाईक शेअर मिळत आहे. लोक वेगवेगळ्या प्रतिक्रियाही यावर नेटकरी देत आहेत.