प्रत्येकजण कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी लोकल ट्रेनने प्रवास करतात. ट्रेन ही प्रवाशांसाठी एक प्रकारची लाईफ लाईन आहे. रोजच्या छोट्या प्रवासासाठी लोकल ट्रेनमध्ये खूप गर्दी असते, पण यावेळी असे चित्र समोर आले आहे, जे पाहून लोकांचे नाही तर भारतीय रेल्वेचेही धाबे दणाणले आहेत. लोकल ट्रेनमध्ये माणसांसोबत घोडाही प्रवास करताना दिसला. लोकल ट्रेनमध्ये माणसांमध्ये घोडाही उभा असल्याचे चित्रांमध्ये दिसत आहे.

लोकल ट्रेनमधील घोड्याचे फोटो व्हायरल होत आहेत. तसेच हा व्हायरल फोटो कधी घेण्यात आला हे रेल्वेने अद्याप सांगितलेले नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे चित्र पश्चिम बंगालमधील सियालदह-डायमंड हार्बर डाउन लोकल ट्रेनचे आहे. बंगालमधील बरुईपूर येथे हा घोडा शर्यतीत सहभागी होऊन परतत असल्याचे बोलले जात आहे. घोड्यासह ट्रेनमध्ये चढलेल्या व्यक्तीला प्रवाशांनी आक्षेप घेतला, मात्र त्याने कोणाचेही ऐकले नाही.

दक्षिण २४ परगणा येथील बरुईपूर येथे झालेल्या शर्यतीत हा घोडा सहभागी झाल्याचे समजते. त्यांनाही फोटो मिळाल्याचे पूर्व रेल्वेच्या प्रवक्त्याने मान्य केले आहे. मात्र, प्रत्यक्षात असे काही घडले की नाही, याची माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. सध्या सोशल मीडियावर फोटो शेअर करून लोकं यावर भन्नाट कमेंट्स करत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यासोबतच लोक भारतीय रेल्वेला प्रश्न विचारत आहेत की घोड्यांनाही ट्रेनमध्ये येण्याची परवानगी मिळाली आहे का? घोड्याचे तिकीट काढले आहे का, असा प्रश्नही अनेकजण विचारत आहेत. त्याच वेळी, अनेक लोक भारतीय रेल्वेने हे विचारात घेण्यास सांगत आहेत.

त्याचवेळी भारतीय रेल्वेने ही छायाचित्रे पाहून आश्चर्य व्यक्त केले असून या छायाचित्रांमध्ये किती तथ्य आहे, याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.