सध्या सनरूफ असलेल्या कार्सना ग्राहक प्रचंड पसंती देत आहेत. सनरूफमधून बाहेर डोकावून अल्हाददायक वातावरणाचा आनंद घेता येते. रात्रीला सनरूफमधून आकाशातील लुकलुकणाऱ्या चांदण्या बघता येतात. पावसाळ्यात सनरूफवर टपटप पडणाऱ्या पाण्याचे दृश्य बघता येते. जंगल सफारीसाठी सनरूफचे फीचर तर उत्तमच. आलिशान कारमध्ये हे फीचर हमखास मिळते. काही लोक ते बसवून घेण्यासाठी कारमध्ये बदल घडवतात. मात्र, चेन्नईमध्ये हे फीचर एका ऑटोमध्ये दिसून आले आहे. ऑटोमध्ये सनरूफ असल्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

एका रेड्डिट युजरने रविवारी या ऑटोवाल्याचा फोटो शेअर केला. फोटो चेन्नईचा असल्याचा दावा केला जात आहे. फोटोमध्ये एक ऑटो चालक ऑटो चालवताना दिसत असून ऑटोला पूर्ण छत असण्याऐवजी तेथे सनरूफ असल्याचे दिसून येते. हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रामाणात व्हायरल होत आहे. ऑटोमध्ये सनरूफ पाहून नेटकरीही अवाक झाले आहेत. u/knivef या रेड्डिट युजरने हा फोटो शेअर केला आहे.

sunroof auto
(source – u/knivef/ reddit)

(Viral : आरआरआरची जपानी यूट्यूबरलाही भुरळ, ‘नाटू नाटू’ गाण्यावर केले अफलातून नृत्य, पाहा व्हिडिओ)

नेटकऱ्यांना कल्पना पटली नाही

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
reddit comment
(source – reddit)

या पोस्टवर भरपूर प्रतिक्रिया देण्यात आल्या आहेत. काहींना सनरूफची कल्पना आवडली नसल्याचे व्यक्त केले. चेन्नईमध्ये सनरूफची गरज नसल्याचे एका युजरने म्हटले आहे. चेन्नई शहर वर्षभर उबदार राहत असल्याने सनरूफ बसवण्याची कल्पना पटली नसल्याचे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. तर एकाने हे धोकादयक असल्याचे मत व्यक्त केले. या ऑटोचा फायनल डेस्टिनेशन चित्रपटासाठी वापर होऊ शकतो, असे मत एका युजरने व्यक्त केले आहे.