अनेकांनी डॉल्फिन मासा एकदा तरी पाहिला असेल. जे अगदी लहान व्हेलसारखे असतात. समुद्र आणि नद्यांमध्ये आढळणाऱ्या या माश्यांपासून मानवाला अजिबात धोका नसतो त्यामुळे ते त्यांच्यात पूर्णपणे मिसळते. यामुळेच डॉल्फिन हा जगातील सर्वात बुद्धिमान जलचर प्राणी मानला जातो. आजवर आपण राखाडी रंगाचे डॉल्फिन समुद्रात उंचच उंच उड्या मारताना पाहिले, सध्या सोशल मीडियावर एका दुर्मिळ डॉल्फिनचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल, (Dolphin Acrobatics In Sea). या डॉल्फिनचा रंग चक्क गुलाबी आहे, अशाप्रकारचा डॉल्फिन पाहून मच्छिमारही चक्रावले.
या गुलाबी डॉल्फिनचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. जो अमेरिकेतील लुईझियानामधील असल्याचे सांगितले जात आहे. जिथे गेल्या आठवड्यात एक दुर्मिळ गुलाबी रंगाचा डॉल्फिन पाण्यात पोहताना दिसला. एक वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, २० वर्षांहून अधिक काळ मासेमारी करणाऱ्या थर्मन गुस्टिन नावाच्या मच्छिमाराने या दुर्मिळ डॉल्फिनचा व्हिडीओ शूट केला आहे. १२ जुलै रोजी, त्यांनी कॅमेरॉन पॅरिशमधील मेक्सिकोच्या खाडीजवळ गुलाबी डॉल्फिन पाहिला ज्याचा व्हिडिओ फेसबुकवर पोस्ट केला, जो आता तुफान व्हायरल होत आहे.
थर्मन यांनी पुढे सांगितले की, या भागात अनेकदा डॉल्फिन पाहायला मिळता, परंतु अशाप्रकारचा दुर्मिळ गुलाबी डॉल्फिन त्यांनी पहिल्यांदाच पाहायला मिळाला, जो पाहून तेही खूप आश्चर्यचकित झाले. ते पुढे म्हणाले की, मी गेल्या अनेक वर्षांपासून मासेमारी करतो. या वर्षात लुईझियाना येण्याची त्याची ही माझी तिसरी वेळ होती. मी खूप भाग्यवान आहे, कारण अशी ठिकाणे फार दुर्मिळ आहेत. तिथं आयुष्य घालवलेल्यांनाही असं काही पाहायला मिळालं नाही.
अहवालानुसार, मच्छिमाराने पाहिलेला डॉल्फिन बहुधा गुलाबी रंगाचा असावा, जो दक्षिण लुईझियानामधील एक प्रसिद्ध डॉल्फिन आहे. २००७ मध्ये कॅल्केसियु नदीत पहिल्यांदा दिसलेला गुलाबी डॉल्फिन अल्बिनो डॉल्फिनसारखा आहे, जो शरारातील काही रंगद्रव्यांच्या कमतरतेमुळे असा दिसतोय.
हा व्हिडीओ @BradBeauregardJ नावाच्या ट्विटर अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, लुईझियाना किनार्यावरील मेक्सिकोच्या खाडीत दुर्मिळ गुलाबी डॉल्फिन दिसला. खूप सुंदर. हा दुर्मिळ क्षण थर्मन गस्टनने कॅमेऱ्यात कैद केला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक गुलाबी रंगाचा डॉल्फिन पाण्यात वेगाने फिरताना दिसत आहे.