Mumbai waterlogging: मुंबईत पाईपलाईन फुटल्याच्या घटना अनेकवेळा घडल्या आहेत. एकीकडे पाणी जपून वापरा अशी जनजागृती केली जाते तर दुसरीकडे अशा घटनांमुळे लाखो लिटर पाणी सहज वाया जातं. दरम्यान आज पुन्हा मुंबईतील लोखंडवाला येथे बीएममीची मुख्य पाण्याची पाइपलाईन फुटल्याची बातमी समोर आली आहे. ज्यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेलं आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. मिळालेल्या माहिती नुसार ही घटना सकाळच्या वेळेला घडली आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

लोखंडवाला येथी ट्विंकल अपार्टमेंटजवळील ही घटना आहे जिथे बीएमसीची मुख्य पाण्याची पाइपलाइन फुटली. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. जो पाहून तुम्हाला अंदाजा येईलच की ही घटनी किती मोठी आहे.पाईप फुटल्यानंतर पाण्याचा जोर इतका जास्त आहे की त्या पाण्याची उंची थेट एका उंच इमारतीपर्यंत पोहोचली आहे. ज्यामुळे रहिवाशांचे देखील हाल झाले आहेत. तर त्या रस्त्यावरुन जाणाऱ्या लोकांवर आणि गाड्यांवर याचा परिणाम दिसत आहे. लोकांच्या घरात सगळ पाणी जात असल्याचं यामध्ये दिसत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – बापरे! वरळीत ४० व्या माळ्यावरून रस्त्यावर पडला लोखंडी खांब, गाडीचा चुरा अन् व्यक्तीचा…धक्कादायक VIDEO व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आजुबाजूच्या इमारतींच्या आक्षरश: टेरेसवर हे पाणी जात आहे. तर आजुबाजूला उंच असणारी नारळाची झाडंही कधीही पडू शकतात अशा स्थितीला आली आहे. या इमारतींमध्ये राहणाऱ्या लोकांबाबत आता चिंता व्यक्त केली जात आहे.