आयुष्य हा जीवन अन् मृत्यूचा खेळ आहे. जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत आपलं आयुष्य सुरू असतं. कोणाचा मृत्यू कधी कुठून येईल हे कोणी सांगू शकत नाही. सोशल मीडियावर अशा थरारक क्षणाचे कित्येक व्हिडीओ रोज व्हायरल होत असतात पण असाच एक काळजाचा थरकाप उडवणार व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओमध्ये एक अक्षरशः मृत्यूच्या दारातून परत आल्याचे दिसत आहे. सोशल मीडियावर एक थरारक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. न्यूजर्सीमध्ये एका पिझ्झा डिलिव्हरी एजंटच्या अंगावर वीज पडणार होती पण सुदैवाने तो थोडक्यात वाचला. त्याचा नशीब बलवत्तर होतं म्हणून अन्यथा.. एका क्षणात आयुष्य संपलं असतं.

वीज कोसळण्याचा थरारक क्षण – Doorbell कॅमेऱ्यात कैद (Terrifying Lightning Moment Caught on Doorbell Cam)

ही धक्कादायक घटना डोअरबेल कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सोमवारी संध्याकाळी न्यू जर्सीमध्ये वादळाच्या वेळी एक फूड डिलिव्हरी एजंट पिझ्झा डिलिव्हरी करण्यासाठी आला तेव्हा ही घटना घडली. व्हिडिओमध्ये त्या माणसाच्या मागे एक मोठा वीज कडकडाट आणि जोरदार आवाज येत असल्याचे दिसून आले आहे.

मुसळधार पावसात पिझ्झा डिलिव्हरीसाठी आलेल्या एजंट Jovanni Behun याच्या मागे प्रचंड आवाज करत वीज कोसळली. त्या क्षणाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ पाहणाऱ्यांचे अंगही शहारून गेले.

पिझ्झा डिलिव्हरी बॉयचं सुदैव! वाचला अवघ्या काही इंचांनी (Pizza Delivery Agent Escapes by Inches)

दरवाजा उघडल्यानंतर भयभीत झालेला Jovanni म्हणाला, “मला वाटलं ती वीज माझ्यावरच पडणार होती!”
ABC News ला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, “मी जोरात ओरडलो. आवाज प्रचंड होता. सुरुवातीला काय झालं तेच कळलं नाही. मी फक्त हललो आणि आशा केली की, सगळं ठिकठाक होईल. मी नशिबवान होतो, अजून एक दिवस अनुभवण्यासाठी जिवंत आहे यासाठी मी आभारी आहे.”

व्हिडिओमध्ये दिसतं की, वीज कोसळल्यानंतर Jovanni पटकन पिझ्झा देतो आणि घाबरत घाबरत गाडीच्या दिशेने धावतो. त्या वेळी आकाश काळ्या ढग जमा झाल्याचे दिसते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुसळधार पावसामुळे २ जणांचा मृत्यू

न्यू यॉर्क शहर परिसरात संततधार पावसाने पाणी साचले आणि द न्यू यॉर्क टाईम्सच्या वृत्तानुसार, न्यू जर्सीमध्ये त्यांची कार ओढ्यात वाहून गेल्याने किमान दोन जणांचा मृत्यू झाला. पूर्व समुद्रकिनाऱ्यावरील जलमार्ग वादळांनी भरल्याने या भागात आणीबाणीची स्थिती लागू करण्यात आली होती आणि हवामान विभागाने इशारा दिला होता की वॉशिंग्टन, डीसी ते कॅरोलिनासपर्यंत अजूनही पूर येण्याची शक्यता आहे.