Dada bhuse dance Viral video: पंतप्रधान नरेंद्र मोदी काल शुक्रवाकी नाशिक दौरा केला. या दौऱ्यामध्ये पंतप्रधानांनी युवा महोत्सवाचे उद्घाटन केले. कृषीमंत्री भुसे हे देखील नाशिक येथूनच येतात.त्यांचा विधानसभा मतदारसंघही नाशिकमध्येच आहे. त्यामुळे या सोहळ्यावर भुसे यांचे बारीक लक्ष होते. दरम्यान राज्याच्या कृषीमंत्री दादा भूसे यांनी पंतप्रधान मोदींच्या स्वागताला तीन पावली नृत्य केलं. राष्ट्रीय युवा महोत्सव कार्यक्रमात हालगीच्या तालावर ठेका धरला. दादा भुसे यांचा तरुणांसोबत डान्स करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी रामकुंड येथे गोदावरी पुजा केली व त्यानंतर त्यांनी काळाराम मंदीराकडे रवाना झाले. यावेळी त्यांनी काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेतले आणि प्रभू श्रीरामाच्या चरणी नतमस्तक झाले. त्यांनी तेथे गणपतीची व रामांची आरती केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींची काळाराम मंदिरात त्यांना संस्यानच्या वतिने रामांची मुर्ती भेट म्हणुन देण्यात आली.येथे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे देखील उपस्थित होते. पंतप्रधानांच्या स्वागतासाठी त्यांनी जय्यत तयारी केली होती. यावेळी दादा भुसे यांनी तीन पावली नृत्य सादर केलं.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी कीर्तनात तल्लीन; काळाराम मंदिरात पूजेनंतर टाळ वाजवत केलं भजन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पंतप्रधान नाशिकच्या पवित्र भूमीत आले आहेत. जगभरात मोदींच्या नावाचा गौरव होतोय. मोदी है तो मुमकिन है, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधानांचं कौतुक केलं. पंतप्रधान मोदी यांनी देशातील सर्वात लांब पुल अटल सेतूचे उद्घाटन देखील केले. तसेच गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या रामकुंडावर प्रार्थना केली.