नुकत्याच पार पडलेल्या जपानमधील G7 शिखर परिषदेत मोदींचीच खूप चर्चा होती. त्यामागील कारण आहे त्यांनी परिधान केलेलं जॅकेट. तुम्हाला वाटेल, या जॅकेटमध्ये एवढं काय विशेष आहे? आज आपण त्याविषयीच सविस्तर जाणून करणार आहोत. जपान दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुनर्वापर केलेल्या साहित्यांपासून बनवलेले एक खास जॅकेट परिधान केले होतं, जे सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलंय.

मोदींचं जॅकेट चर्चेत

नरेंद्र मोदींचा सदरी जॅकेट लूक जगभरात फेमस आहे पण या वेळी हिरोशिमा येथील शांती स्मारक संग्रहालयाला भेट देताना त्यांनी परिधान केलेले जॅकेट प्लास्टिकचा पुनर्वापर करून बनवलेले होते, त्यामुळे या सदरी जॅकेटने सर्वांचे लक्ष वेधले. हे जॅकेट बेंगळूरू येथील इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिले होते.

हेही वाचा – Video: गंगा नदीत राफ्टिंग दरम्यान दोन गटांत तुफान हाणामारी, बचावासाठी तरुणानं मारली वाहत्या पाण्यात उडी अन्…

या जपान दौऱ्यादरम्यान त्यांनी हिरोशिमा येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचेही अनावरण केले.
मोदींचा परदेशी दौरा हा नेहमी चर्चेचा विषय असतो. ते नेहमी भारतीय संस्कृतीचा प्रसार करताना दिसून येतात.