पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मेघालय, त्रिपुरा या राज्यांना रविवारी (१८ डिसेंबर, २०२२) भेट दिली. या राज्यांमध्ये पुढच्या वर्षी निवडणुका होणार आहेत. ६,८०० कोटींचे प्रकल्प हे पंतप्रधानांच्या या दौऱ्यातील चर्चेचा विषय होता. यावेळी पंतप्रधानांनी तेथील पारंपारिक पोशाख परिधान केला होता. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात तिथल्या कलाकारांनी ‘वंदे मातरम’चे एका वेगळ्या पद्धतीने सादरीकरण केले, ज्याचे कौतुक पंतप्रधानांनी केलेमी याचा व्हिडीओही त्यांनी शेअर केला आहे. पाहा व्हिडीओ.
नरेंद्र मोदींनी शेअर केलेला व्हिडीओ:
नरेंद्र मोदींनी हा व्हिडीओ शेअर करत ‘वंदे मातरमचे अत्यंत उत्तम सादरीकरण ऑक्टेव्ह बँडने केले’ असे कॅप्शन त्यांनी दिले आहे. या सुमधुर सादरीकरणाचा व्हिडीओ अनेक भाजपा नेत्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.