अंकिता देशकर

Police Beating Man Video: लाइटहाऊस जर्नलिझमला सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याचे लक्षात आले. यामध्ये पोलीस एका व्यक्तीला मारहाण करताना दिसत आहेत. हे पाहून यूजर्सनी पोलिसांवर कडक कारवाई करण्याची मागणीही केली आहे.

काय होत आहे व्हायरल?

ट्विटर युजर NewzTruth ने व्हायरल व्हिडिओ आपल्या प्रोफाइल वर शेअर केला.

हा व्हिडिओ इतर यूजर्स देखील शेअर करत आहेत.

तपास:

आम्ही व्हिडिओचे स्क्रीनशॉट घेऊन आणि या स्क्रीन ग्रॅबवर गूगल रिव्हर्स इमेज सर्च वापरून आमचा तपास सुरू केला. आम्हाला TEGIYA BANGLES या चॅनेल वर एक शॉर्ट सापडला. ज्याचे शीर्षक होते: ‘दोस्ती की सजा’.

आम्हाला ‘Vipin Pandey Entertainment’ या चॅनेल वर देखील हा शॉर्ट सापडला. या व्हिडिओ चे शीर्षक होते: लवकरच व्हिडिओ येत आहे त्यामुळे कृपया माझ्या youtube चॅनेलला सपोर्ट करा

आम्ही हे युट्युब चॅनल तपासले ज्यात सारखेच दिसणारे शॉर्ट्स आम्हाला सापडले.

व्हिडिओ आठ दिवसांपूर्वी अपलोड करण्यात आला होता आणि त्याला १४ हजार व्ह्यूज मिळाले होते. व्हिडिओमधील कलाकार, निर्माता, डीओपी, लेखक आणि संपादक यांचा उल्लेख होता. संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या साक्षी हत्याकांडावर हा लघुपट आधारित असल्याचे वर्णनात म्हटले आहे.

व्हायरल व्हिडिओ मध्ये दिसत असलेले फ्रेम्स 8 मिनिटांनंतर डॉक्युमेंटरीमध्ये पाहता येतात.

विपिन पांडेने त्याच्या फेसबुक प्रोफाइलवरही हे शॉर्ट्स शेअर केले होते.

हा शॉट त्याच्या आगामी शॉर्ट फिल्मचा असल्याचे त्याने रीलमध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे.

या लघुपटाचे निर्माते विपिन पांडे यांच्याशीही आम्ही संपर्क साधला. त्याने आम्हाला माहिती दिली की यूट्यूब शॉर्ट हा त्याच्या ‘दोस्ती की सजा’ या लघुपटातील आहे आणि त्याने पोस्ट केलेले शॉर्ट्स व रील्स हे त्यांच्या आगामी चित्रपटातील आहेत. व्हायरल झालेला दावा खोटा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

हे ही वाचा<< भारतात ‘मुस्लिम एक्सप्रेस’ धावणार? ट्रेनचे दृश्य पाहून नेटकरी संतप्त; म्हणाले, “गार्डचं पण ऐकत नाहीत, स्टेशनवरच…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निष्कर्ष: युट्युब डॉक्युमेंटरीमधील पोलिसांच्या क्रूरतेचा स्क्रिप्टेड व्हिडिओ वास्तविक घटना म्हणून व्हायरल होत आहे. व्हायरल झालेले दावे खोटे असल्याचे चित्रपट निर्मात्याचे म्हणणे आहे.