Viral Video: कडक उन्हामुळे माणसांची आणि प्राण्यांची अवस्था आणखीनच बिकट झाली आहे. अशा परिस्थितीत त्यांना मदत करणे ही आपली जबाबदारी बनते. दरम्यान यूपीच्या एका पोलीस कॉन्स्टेबलचा (UP Police) एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. कडक उन्हात कामावर तैनात असलेल्या पोलीस कॉन्स्टेबलने प्राण्यांना फळ खाऊ घालून लोकांची मने जिंकली आहेत. या यूपी पोलीस कॉन्स्टेबलचे जवानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओने लोकांची मनं जिंकली आहेत. वास्तविक, व्हिडीओमध्ये एक कॉन्स्टेबल माकडांना फळ खाऊ घालताना दिसत आहे. हा व्हिडीओ शाहजहांपूरचा आहे. हा व्हिडीओ उत्तर प्रदेश पोलिसांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर १२ जून रोजी शेअर करण्यात आला आहे.

यूपी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हिडीओमध्ये दिसणार्‍या कॉन्स्टेबलचे नाव मोहित आहे, जो डायल ११२ च्या पीआरव्ही १३८८ (PRV1388) मध्ये तैनात आहेत. या कडक उन्हात हवालदार मोहित आपल्या कर्तव्यासोबतच प्राण्यांची काळजी घेत आहेत. व्हिडीओमध्ये ते फळ कापून माकडांना खायला घालताना दिसत आहे. माकड आणि त्याची मुलेही त्यांच्या पाळी येण्याची वाट पाहत आहेत.

(हे ही वाचा: वाघिण कुटुंबासह जंगलात निघाली फिरायला; जंगल सफारीदरम्यानचा Video Viral)

(हे ही वाचा: दोन-तीन नव्हे तर सात जण एकाचवेळी दुचाकीवर स्वार! व्हिडीओ सोशल मीडियावर Viral)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

शाहजहांपूरचा कॉन्स्टेबलचे मोहित यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कॉन्स्टेबल मोहित यांचा या उदात्त कार्याचे यूजर्स कौतुक करत आहेत. या व्हिडीओला आतापर्यंत जवळपास ६२ हजाराहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. जवळपास ४ हजार लोकांनी लाइक केले आहे. या व्हिडीओवर सातत्याने कमेंटही करत आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘खूप गोड, भाऊ एवढ्या प्रेमाने खाऊ घालत आहे, जसे एखाद्या मुलाला खायला घालतो.’